मुंबई : आपल्या कामाचा ताण (Stress) वाढला की, आपली चिडचिड होऊ लागते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर हमखास होऊ लागतो. कामाच्या गडबडीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या व झोपेच्या वेळेची गडबड होते. (how to manage stress)
हे देखील पहा -
ऑफिसमधला कामाचा ताण कधी कधी इतका धोकादायक असतो की, ते आपल्या नैराश्याचे कारण बनते. बदलेल्या जीवनशैलीनुसार व कामकाजामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात. कामाच्या तणावामुळे अधिक तर आपली चिडचिड होत असते. कामाचा ताण गरजेपेक्षा अधिक वाढला तर आपल्याला मानसिक थकवा येऊ लागतो. अशावेळी ना कामात मन लागते, ना आरोग्य निरोगी राहाते. यामुळे आपण चिडचिड, थकवा यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा या समस्यांमुळे (Problems) झोप न लागणे, भूक न लागणे अशा समस्याही आढळतात. त्यासाठी आपण काय करायला हवे हे पाहूया.(How to reduce stress and anxiety)
१. मनाला तणावापासून दूर ठेवण्यासाठी आपण विश्रांती घेणे गरजेचे आहे. सतत काम केल्यास मन व शरीर आपल्याला साथ देत नाही. काम करताना काही काळ ब्रेक घ्या.
२. इतरांना मदत करताना त्याचा कामाचा ताण स्वत:वर वाढवू नका त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. आपले काम पूर्ण झाल्यानंतर व आपल्याकडे वेळ असेल तर दुसऱ्यांना मदत करा.
३. काम करताना बऱ्याचदा आपली तणावामुळे चिडचिड होऊ लागते. असावेळी आपण जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्याने आपली अस्वस्थता व चिडचिड कमी होईल.
४. सोशल मिडीयावर अधिक काळ सक्रिय असल्यासही आपला ताण वाढतो. त्यासाठी कामाचा ताण आल्यास सोशल मिडीयापासून लांब रहा.
५. सतत जर आपल्या कामाचा ताण येत असेल तर तो आपल्याला का येतो याचे कारण शोधा. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.