Hair care tips, Hair falls problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अति उष्णतेमुळे केस खराब होताय तर या टिप्स फॉलो करा

शरीरासाठी उन्ह गरजेचे असते पण, तितकेच ते केसांसाठी गरजेचे आहे का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या त्वचेसोबतच (Skin) केसांना देखील जपणे अधिक गरजेचे आहे. उन्हाळा येताच त्वचेसोबत केसांचीही समस्या सुरु होते. केसांमध्ये सतत घाम सुटणे. केसात कोंडा होणे, केस सतत ओले राहणे आणि केसांमध्ये खाज सुटण्याची समस्या वाढते. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात.

हे देखील पहा -

विशेषतः उन्हाळ्यात केसांची काळजी अधिक घ्यायला हवी. उन्हाळ्यात केस खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर सूर्यप्रकाशापासून वाचवणे अधिक गरजेचे आहे. शरीरासाठी उन्ह गरजेचे असते पण, तितकेच ते केसांसाठी गरजेचे आहे का ? केसांना (Hair) अधिक सूर्यप्रकाश मिळाला तर काय होईल ? केसांना अति उष्णतेपासून कसे वाचवाल? केसांना कमकुवत आणि निर्जीव होण्यापासून रोखण्यासाठी केसांची काळजी घेण्यासाठी कोणत्‍या टिप्स (Tips) महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.

या टिप्स फॉलो करा

१. स्कार्फ किंवा टोपी -

उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आपण स्कार्फ किंवा टोपी वापरणे आवश्यक आहे. असे केल्यास, केस सूर्याच्या किरणांपासून सुरक्षित राहतील आणि केसांना कमीत कमी नुकसान होईल.

२. केसांच्या स्वच्छतेची काळजी -

अधिक उष्णतेमुळे केसांमध्ये घाम येण्याची समस्या सामान्य निर्माण होते. घाम जमा झाल्यानंतर केस धुवावेत. असे केल्याने घामासोबत बॅक्टेरियाही निघून जातील. तसेच, शॅम्पूने केस धुतल्यास ते कोरडे होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक वेळी शॅम्पू वापरण्याऐवजी फक्त पाण्याने केस धुवा.

३. कंडिशनर आवश्यक -

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका. केसांना कंडिशनर वापरल्याने त्याची आर्द्रता टिकून राहते व केस तुटत नाहीत. तसेच, घामामुळे कोरडे झालेले केस पुन्हा मऊ होतात.

४. केसांना ट्रिम करा -

काही महिन्यांच्या अंतरानंतर आपले केस नियमितपणे ट्रिम करायला हवे. यामुळे निस्तेज आणि दुभंगलेल्या केसांच्या समस्येपासून आपला बचाव होईल आणि केसांची वाढ देखील सुधारेल.

५. हेअर पॅक आवश्यक –

तसेच, उन्हाळ्यात शक्यतो नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेले हेअर पॅक लावायला हवा. यामुळे केसांमध्ये कोरडेपणा राहत नाही आणि केस मजबूत राहतात.

अशाप्रकारे उन्हाळ्यात केसांची काळजी घ्या.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुर्दैवानं एक-दोन सोडले तर इतर क्रिकेटपटूंनी...; पहलगाम हल्ल्यातील मृताच्या पत्नीचा भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध

Aarpaar Movie Review: आरपार हिट की फ्लॉप? वाचा संपूर्ण रिव्ह्यू

Dnyanda Ramatirthkar: डोक्यावर बिंदी अन् ओठावर लाली, अभिनेत्री काव्याचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

...तर सरकारमधून बाहेर पडेन, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा कडक इशारा, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून युवकानं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT