दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्यासाठी आहार कसा असावा

कामात व्यस्त असणाऱ्या लोकांनी कोणते पदार्थ खायला हवे.
Diet plan for busy people
Diet plan for busy people ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलत्या जीवनशैलीत काम आणि आहाराकडे लक्ष देणे खरेतर कठीण आहे. आपले जीवन जितके चांगले असायला हवे तितकेच ते निरोगी देखील असायला हवे. परंतु, आपण कामात इतके व्यस्त असतो की, आपल्याला जेवणासाठी पुरेसा वेळही मिळत नाही. कधीकधी आपले जेवणाकडे विशेष लक्ष नसते. तसेच, बसून जेवण करायलाही आपल्याला वेळ मिळत नाही. ताणतणावात जास्त वेळ काम करणे आणि अनियमित वेळी खाणे यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होऊ शकतो.

हे देखील पहा -

दिवसभरात हे पदार्थ खा -

१. मसूर आणि शेंगा यांचे सेवन केल्याने शरीरातील प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. यात असणारे प्रथिने आपल्या शरीराची ताकद वाढवण्‍यास आणि ती दुरुस्त करण्‍यास मदत करते.

२. आपल्या दैनंदिन आहारात तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, गहू या तृणधान्यांना खूप महत्त्व आहे पण, त्याचे सेवन रोजच्या आहारात समतोल प्रमाणात असावे. हे सर्व फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले परिपूर्ण स्त्रोत आहे.

Diet plan for busy people
धार्मिक कार्यात वापरल्या जाणाऱ्या पानाचे फायदे असेही !

३. दिवसभर व्यस्त असणाऱ्यानी भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया, नट, फळे, कमी साखर (Sugar) असलेले प्रोटीन बार, अंकुरलेले मूग, भाजलेले चणे खावेत. सर्व प्रथिने समृद्ध असण्यासोबतच ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करता येतो तसेच, वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. सकाळी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खावे. बदाम खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तर, मेंदूचे कार्य सुधारण्यासोबतच स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होते. त्याचप्रमाणे ड्रायफुट्समधे प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे रक्तातील (Blood) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी तसेच हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

५. दिवसभर हायड्रेटेड राहिल्याने एनर्जी लेव्हल वर राहते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com