knuckle cracking arthritis myth saam tv
लाईफस्टाईल

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

knuckle cracking arthritis myth: अनेकांना बोटांचे सांधे वाजवण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे आणि संधिवात (Arthritis) होतो असा समज अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात आहे. मात्र डॉक्टरांच्या मते, हा एक गैरसमज आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेकांना बसल्या-बसल्या किंवा आळस देताना हाताची बोटं मोडण्याची फार सवय आहे. कदाचित तु्म्हालाही ही सवय असेल...हाताची बोटं मोडल्याने आर्थराटीस म्हणजे संधिवात होतो, असंही कदाचित तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र ही गोष्ट खरंच इतकी धोकादायक आहे का, संशोधन याविषयी काय सांगतं ते पाहूयात.

बोटं मोडल्यानंतर आवाज का होतो?

अभ्यासकांनी मान्य केलं आहे की, पायाची बोटं किंवा इतर सांधे वाजवताना होणारा आवाज हा वायूमुळे होतो. हा आवाड हाडं घासल्यामुळे किंवा कुर्च्या तुटल्यामुळे येत नाही. २०१५ मधील एका अभ्यासात MRI स्कॅनद्वारे बोटं मोडताना हा आवाज प्रत्यक्ष टिपला गेला. स्कॅनमध्ये असं दिसलं की, ज्यावेळी मोडण्यासाठी बोटं ओढली जातात तेव्हा सांध्यातील दाब अचानक कमी होतो. सांध्यांना गुळगुळीत ठेवणारं Synovial Fluid वाढलेली जागा पटकन भरू शकत नाही. त्यामुळे त्या द्रवात वायूने भरलेली पोकळी तयार होते. या प्रक्रियेला Tribonucleation म्हणतात. दरम्यान ही पोकळी तयार होताना होणारा बदलच तो आवाज सतो.

अल्बर्टा विद्यापीठातील Rehabilitation Medicine विभागाचे प्राध्यापक ग्रेग कावचुक यांनी ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे थोडंफार व्हॅक्यूम तयार करण्यासारखं आहे. सांध्यांचे पृष्ठभाग अचानक वेगळे झाले की, द्रव त्याठिकाणी राहत नाही. त्यामुळे पोकळी तयार होते आणि त्याच वेळी आवाज होतो.

बोटं मोडणं आरोग्यासाठी धोकादायक आहे का?

बोटं मोडल्याने आरोग्यासाठी काही धोका होतो का, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. गेले नेक वर्ष असं मानलं गेलंय की, सतत बोटं मोडल्याने संधिवात होतो. मात्र संशोधनातून अशी कोणतीही गोष्ट समोर आली नाही.

यासाठी डॉ. डोनाल्ड उंगर यांनी स्वतःवर प्रयोग केला. त्यांनी ५० वर्षे दररोज डाव्या हाताची बोटं मोडली. मात्र उजव्या हाताची बोटं मोडली नाहीत. २००४ मध्ये त्यांनी याचे निष्कर्ष सांगितले. यावेळी त्यांच्या दोन्ही हातांमध्ये संधिवात किंवा सांध्यांच्या आरोग्यात काही फरक दिसून आला नाही. या अनोख्या प्रयोगासाठी त्यांना २००९ मध्ये Ig Nobel Prize मिळाले.

इतकंच नाही तर यासंबंधी करण्यात आलेल्या इतर संशोधनातही याच गोष्टी आढळून आल्या. नियमित बोटं मोडणारे आणि न मोडणाऱ्या लोकांची तुलना केली असता पकडण्याची ताकद किंवा कूर्च्याची जाडी यात काही फरक आढळला नाही. जरी बोटं मोडताना लागणारा जोर जास्त असला तरीही पुन्हा पुन्हा असं केल्याने कायमस्वरूपी नुकसान होतं असे पुरावे सापडले नाहीत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात शरद पवार गटाला खिंडार! कामराज निकम यांचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

Mumbai Bullet Train : मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकाचं काम बंद! काय आहे नेमकं कारण? वाचा

Eyebrow Growth: मेकअप न करता भुवया नीट कशा दिसतील? वापरा या सोप्या टीप्स

SCROLL FOR NEXT