लाईफस्टाईल

Hyperpigmentation च्या समस्येवर रामबाण ठरेल मध, अशाप्रकारे करा वापर

Hyperpigmentation Causes : हायपरपिग्मेंटेशन म्हणजे त्वचेवर डाग. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य कमी होते. यामध्ये त्वचेवर काळे ठिपके जे मुरुम निघून गेल्यावरही त्वचेवर खूण म्हणून राहतात.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनांचा वापर करतो. परंतु, बरेचदा प्रदूषण, धूळ आणि इतर गोष्टींमुळे त्वचा खराब होऊ लागते. ज्यामुळे आपल्या त्वचेवर मुरुमे दिसू लागतात. चेहरा सतत तेलकट होतो. त्यातील सगळ्यात मोठी समस्या हायपरपिग्मेंटेशन.

हायपरपिग्मेंटेशन म्हणजे त्वचेवर (Skin) डाग. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य कमी होते. यामध्ये त्वचेवर काळे ठिपके जे मुरुम निघून गेल्यावरही त्वचेवर खूण म्हणून राहतात. यामुळे त्वचेवर डार्क सर्कल तयार होतात. यावर मात कशी करायची जाणून घेऊया.

1. हायपरपिग्मेंटेशन कशामुळे होते?

जेव्हा त्वचेच्या पेशी मेलेनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशनची समस्या तयार होते. मेलॅनिन हा पदार्थ आपल्या त्वचेला रंग देतात. हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येमुळे त्वचेचा रंग बदलतो.

2. कच्चे दूध आणि मध

हायपरपिग्मेंटेशन दूर करण्यासाठी कच्चे दूध (Milk) देखील फायदेशीर आहे. मधात मिसळून कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावा. किमान ५-१० मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हातांनी मसाज केल्याने डाग दूर होतील.

3. मुलतानी माती आणि मध

हायपरपिग्मेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी मुलतानी माती आणि मध मिसळून लावा. मुलतानी माती देखील उन्हाळ्यात (Summer Season) त्वचेला थंडावा देते. हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या, त्यात मध घाला. पेस्ट बनवण्यासाठी गुलाबजल टाका. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT