Masala Dosa Recipe
Masala Dosa Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Masala Dosa Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा साउथ इंडियन स्टाईल मसाला डोसा, पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Hotel Style Masala Dosa Recipe : आपल्या भारतात असे अनेक पदार्थ आहेत त्याची चव आपण कधी तरी चाखलीच असेल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात आपण त्याला हमखास बनवण्याचे ट्राय करतो. परंतु, एकतर तो पदार्थ फसतो किंवा तो खालेल्या टेस्ट सारखा लागत नाही.

साउथ इंडियन हॉटेल किंवा अण्णाकडच्या टेस्ट सारखा आपला डोसा खरेतर बनत नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तो तव्याला टिकटणारही नाही, हमखास टेस्टी व कुरकुरीत असा हॉटेलसारखा चविष्ट डोसा बनवू शकतो. जाणून घेऊया रेसिपी (Recipe)

1. साहित्य

  • २ कप उकडलेले तांदूळ (Rice)

  • १/२ कप उडीद डाळ

  • 1 टीस्पून मीठ

  • 1/4 कप रिफाइंड तेल

  • १/२ टीस्पून मेथी दाणे

2. फिलिंगसाठी

  • १/२ किलो उकडलेला बटाटा (Potatoes)

  • २ मध्यम चिरलेली हिरवी मिरची

  • 1 टेबलस्पून मोहरी

  • 1/4 टीस्पून हळद

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • 1 1/2 कप चिरलेला कांदा

  • २ टेबलस्पून रिफाइंड तेल

  • 10 पाने कढीपत्ता

  • 1/4 कप पाणी

3. कृती

  • डोसा पीठ तयार करण्यासाठी, तांदूळ (त्यात मेथी घालून) आणि उडीद डाळ धुवून साधारण ६-८ तास वेगळ्या डब्यात भिजत ठेवा.

  • तांदूळ आणि उडीद डाळ नीट भिजल्यावर, मिक्सरमध्ये ज्या पाण्यात भिजवले होते ते पाणी वापरून मिक्सरमध्ये मिश्रण एकसारखे होईपर्यंत वेगवेगळे बारीक वाटून घ्या. जोपर्यंत मिश्रण एकसारखेपणा येईपर्यंत.

  • दोन्ही पीठ एका मोठ्या डब्यात एकत्र मिसळा आणि त्यात मीठ घाला. चांगले एकत्र करुन रात्रभर आंबू द्या.

  • डोसामध्ये मसाला भरण्यासाठी, जाड तळाच्या पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करा आणि मोहरी तडतडू द्या.

  • नंतर त्यात चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून कांदे गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात चिमूटभर मीठ, हळद घालून नीट मिसळा.

  • आता चौकोनी तुकडे केलेले बटाटे घ्या आणि त्यात परतून घेतलेल्या कांद्यामध्ये घाला आणि एकत्र करा.

  • मिश्रणात हळूहळू पाणी घाला आणि बटाटे सुमारे 4 मिनिटे उकळू द्या. जेव्हा मिश्रण अर्धे शिजले असे वाटेल तेव्हा गॅस बंद करुन वाफेवर थोडा वेळ ठेवा

  • आता डोश्याचा तवा घेऊन मंद आचेवर गरम करा. डोसा तयार करण्यासाठी त्यावर १ चमचा तेल टाका. तवा गरम झाल्यावर पीठ ओता आणि गोलाकार आकारात पसरवा.

  • डोसाच्या कडांचा रंग तपकिरी झाल्यावर मंद आचेवर ठेवून डोसाच्या बाजूने तेलाचे काही थेंब शिंपडा आणि 2 चमचे तयार बटाट्याचे मिश्रण घाला. डोसा फोल्ड करा. गरमागरम मसाला डोसा नारळाची चटणी आणि सांभार सोबत सर्व्ह करा.

4. टिप

  • डोसासाठी योग्य पिठात बनवण्यासाठी, उकडलेले तांदूळ वापरा. यामुळे तुमचा डोसा आणखी कुरकुरीत होईल.

  • तुमच्या डोश्याला सोनेरी रंग येण्यासाठी तुमच्या पिठात कोरडी भाजलेली चणाडाळ वापरा.

  • चांगला डोसा बनवण्यासाठी 1-2 चमचे मेथीचे दाणे वापरून पहा आणि आपले पिठ उबदार ठिकाणी ठेवा. यामुळे तुमचा डोसाही चविष्ट होईल.

  • तुम्ही डोसा बनवणाऱ्यांना गरम तव्यावर पाणी शिंपडून डोसा बनवताना पाहिले असेल. हे नॉन-स्टिक पॅनवर करू नका, कारण त्याचा कोटिंगवर परिणाम होऊ शकतो.

  • तुमचा मसाला डोसा बनवण्यासाठी नेहमी तूप किंवा लोणी वापरा कारण त्यामुळे चव वाढेल. (Lifestyle News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : शरद पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी, इचलकरंजीतल्या सभेत अनेक जण धडपडले; VIDEO

Sudhir Mungantiwar News | '10 जून पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येणार' मंत्री मुनंगंटीवार यांची माहिती

Today's Marathi News Live : ​महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतल्या सभेत चेंगराचेंगरी

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Rahul Gandhi News | महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधींचा जयघोष

SCROLL FOR NEXT