Spine Health  Saam Tv
लाईफस्टाईल

Spine Health : जपायला हवे पाठीच्या कण्याचे आरोग्य, कशी घ्याल काळजी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Take Care Of Your Spine Health :

पाठीचा मणका हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव असतो. मणक्यावर आपल्या संपूर्ण शरीराचा भार पेलला जातो. उठणे, बसणे, झोपणे अशा शारीरीक क्रिया या मणक्याशी निगडीत असतात.

आपल्या मणक्याचे आरोग्य चांगले नसेल तर आपलेही आरोग्य चांगले राहत नाही. त्यामुळे मणक्याची हालचाल चांगली होणं आणि तो ताठ असणं आवश्यक आहे. चूकीच्या शारीरिक मुद्रेमुळे पाठीच्या कण्यासंबंधीत अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शारीरिक वेदना या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करते.

मणक्याच्या समस्येमुळे होणार्‍या तीव्र वेदनामुळे तणाव आणि चिंता वाढतात ज्यामुळे एखाद्याच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. नियमित व्यायाम आणि बसण्याची योग्य पध्दत अवलंबविल्यास शारीरिक अस्वस्थता टाळता येते आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारणा होते.

नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन डॉ. बुरहान सियामवाला म्हणतात या वर्षीच्या #moveyourspine या संकल्पनेनुसार मणक्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स खाली देण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या डेस्कवर बसताना, उभे राहताना किंवा चालताना शारीरिक मुद्रा योग्य ठेवणे गरजेचे आहे.यामुळे मणक्यावर ताण येणार नाही.

निरोगी (Healthy) मणक्यासाठी नियमित व्यायाम हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. लवचिकता आणि स्ट्रेंथ वाढवणार्‍या व्यायामामुळे पाठीच्या स्नायूंना आधार मिळू शकतो आणि पाठीच्या कण्याचे आरोग्य चांगले राहते. योगा आणि पिलाटेज सारखे व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतात. आपल्या मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी निरोगी वजन राखणे आवश्यक आहे. जास्त वजनामुळे मणक्याच्या संरचनेवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे हर्निएटेड डिस्क्स किंवा ऑस्टिओपोरोसिस सारख्या विकसनशील परिस्थितींचा धोका वाढतो.

दीर्घकाळापर्यंत बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी ठराविक वेळानंतर उठून उभे रहा, हाता-पायांची हलचाल करा, स्ट्रेचिंग करायला विसरु नका. जास्त वेळ बसून राहिल्याने शारीरिक मुद्रा खराब होणे आणि स्नायुंमध्ये असंतुलन होऊ शकते जे कालांतराने तुमच्या मणक्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. पाठीचे स्नायू सक्रिय रहावे याकरिता चालणे किंवा स्ट्रेचिंग करायला विसरु नका.

जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलल्याने तुमच्या पाठीच्या स्नायूंवर (Back Pain) ताण निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे पाठीला दुखापतही होऊ शकते. चूकीच्या पध्दतीने वजन उचलल्याने पाठीच्या कण्याला दुखापत होऊन त्याचे नुकसान होऊ शकते. जड वस्तू उचलताना केवळ पाठीवर जोर न देता तुमच्या नितंबाच्या मदतीने वजन उचलण्याचा प्रयत्न करा.

झोपेच्या स्थितीकडे लक्ष देणे, योग्य गादीची निवड, उशीचा योग्य वापर हे अतिशय गरजेचे आहे. झोपेच्या (Sleep) चूकीच्या पध्दतीमुळे वेदना किंवा जखम कमी करता येतात. रक्तवाहिन्यांवरील निकोटीनच्या प्रभावामुळे रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो आणि ऑक्सिजन आणि अत्यावश्यक पोषक द्रव्ये पाठीच्या कण्याला पोहोचण्यास अडथळे येतात.

परिणामी, ही प्रक्रिया केवळ मणक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण शरीरात दाह निर्माण करते. त्यामुळे धूम्रपान टाळणे ही काळाची गरज आहे. रोज ३० ते ४५ मिनीटे योगा करा. यामध्ये स्ट्रेचिंग, मागे वाकणे, पुढे वाकणे असे मणक्याशी निगडीत कोणतेही व्यायामप्रकार करायला हवेत. सलग बरेच तास एका जागी बसणे टाळा, मधे ब्रेक घेऊन हालचाल करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT