kidney pain while running Saam TV
लाईफस्टाईल

Kidney Pain While Running: धावताना तुमच्या किडनीची काळजी कशी घ्याल, काय असू शकतो गंभीर धोका?

How to avoid kidney pain while running: धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. मात्र काही लोकांना धावताना किडनीसंदर्भात समस्या जाणवू शकतात. ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

फीट राहण्यासाठी आपण वॉकिंग किंवा रनिंग करतो. धावताना कोणत्याही गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी आपण पुरेशी काळजी घेतो. पण धावताना किडनीच्या समस्यांकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. धावताना किडनी वेदना टाळण्यासाठी, पुरेसे पाणी पिणं, धावण्यापूर्वी आणि दरम्यान हायड्रेटेड राहणे आणि धावल्यानंतर विश्रांती घेणं महत्वाचं आहे.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या

धावताना हायड्रेट राहणं महत्त्वाचं आहे. डिहायड्रेशनमुळे किडनीवर दबाव येऊ शकतो आणि वेदना होऊ शकतात. जेव्हा तुम्ही धावता तेव्हा घामामुळे तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ बाहेर पडतात, म्हणून गमावलेलं द्रव भरून काढणं महत्वाचे आहे. त्यामुळे धावण्याच्या सुमारे १-२ तास आधी भरपूर पाणी प्या

इलेक्ट्रोलाइट संतुलन राखा

धावताना येत असलेल्या घामामुळे केवळ पाणीच नाही तर सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स देखील बाहेर पडतात. तुमच्या स्नायूंच्या कार्यासाठी आणि द्रव संतुलनासाठी इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक असतात. या असंतुलनामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. त्यामुळे याचं संतुलन राखणं गरजेचं आहे.

जेवणानंतर लगेच धावणं टाळा

अधिक प्रमाणात जेवणानंतर, तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी जास्त रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. त्यामुळे तातडीने धावण्यामुळे पचनक्रियेत व्यत्यय येतो. परिणामी पोटात दाब वाढू शकतो आणि किडनीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जेवण आणि धावणं यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर ठेवा. किडनीवरील परिणाम टाळण्यासाठी हे करणं गरजेचं आहे.

योग्यरित्या वॉर्म अप करा

धावण्यापूर्वी वॉर्म अप केल्याने तुमचे शरीर रनिंगसाठी तयार होतं. शिवाय रनिंगपूर्वी वॉर्म केल्यामुळे तमच्या शरीरातील तुमचे स्नायू लवचिक होण्यास मदत होऊ शकते. यामुळे स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे किडनीवर दाब कमी होऊ शकतो. तुम्हाला योग्य प्रमाणात वॉर्म अप करायचं असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

रनिंगच्या पोश्चरवर लक्ष द्या

धावण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तुमच्या शरीरावर, तुमच्या पाठीवर आणि किडनीच्या भागावर अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे धावताना सरळ उभे रहा. यावेळी तुमची पाठ सरळ ठेवा आणि खांदे काहीसे सैल ठेवा. कंबरेपासून थोडे पुढे झुका मात्र वाकू नका.

किडनीसंदर्भातील वेदना आणि मसल पेन यातील फरक काय

किडनीसंदर्भातील वेदना आणि मसल पेन वेगवेगळे वाटू शकतं. तुम्हाला कोणत्या प्रकारची वेदना होत आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

किडनीसंदर्भातील वेदना: सहसा तुमच्या वरच्या पाठीत, बरगड्यांच्या अगदी खाली जाणवते. हे तीव्र क्रॅम्पसारखे असू शकते. यामध्ये मांडीचा सांधा किंवा पोटापर्यंत वेदना होतात.

मसल पेन: सामान्यतः तुमच्या स्नायूंमध्ये जाणवते. या वेदना विश्रांती घेताना बरे होऊ शकतात.

पेनकिलर्सचा जास्त वापर टाळा

कोणत्याही आजारावर पेनकिलर्स घेणं आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. पेनकिलर्स दीर्घकाळ घेणं किंवा जास्त डोसमध्ये वापरल्यास किडनीचं नुकसान होऊ शकतं. काही लोक वेदना टाळण्यासाठी धावण्यापूर्वी त्यांचा नियमितपणे वापर करतात. जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतं. त्यामुळे असं करणं टाळलं पाहिजे.

धावल्यानंतर कूल डाऊन व्हा

धावल्यानंतर कूल डाऊन होण्यामुळे तुमच्या शरीराला हळूहळू आराम मिळतो. यामध्ये स्नायूंचा ताण कमी होतो. यामध्ये धावल्यानंतर काही मिनिटं हळू चालणे किंवा जॉगिंग तुम्ही करू शकता. यामुळे तुमचं शरीर शांत आणि थंड होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे रनिंगनंतर कूल डाऊन करणं गरजेचं आहे. त्यामुळे किडनीवरही परिणाम होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

SCROLL FOR NEXT