Summer Tips saam tv
लाईफस्टाईल

Summer Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत लहान मुलांच्या केसांची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

उन्हाळ्यात बरेच डास आणि विविध प्रकारचे कीटक आढळून येतात व उद्याने किंवा इतर मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांना हे किटक चावू शकतात. बाहेर खेळायला जाताना मुलांना डासांपासून बचाव करण्यासाठी क्रीम, रोल-ऑन स्टीक, वाइप्सचा वापर करा.

Surabhi Jayashree Jagdish

लहान बाळांची त्वचा ही आपल्या प्रौढांच्या त्वचेपेक्षा पातळ आणि नाजूक असते. त्यामुळे उन्हाचा आणि वाढत्या तापमानाचा बाळांना आपल्यापेक्षा जास्त त्रास होतो. कडक उन्हामुळे बाळाच्या त्वचेला दुखापत होऊ शकते. त्यामुळे प्रखर ऊन अथवा सूर्य प्रकाश यापासून लहान मुलांच्या त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. सीमा जोशी यांनी सांगितलं की, उन्हाळ्यातील कोरड्या त्वचेमुळे मुलांच्या अंगावर लालसरपणा, खाज सुटणे, त्वचेवर सूज येणे आदी गोष्टी जाणवू शकतात. यामुळे उन्हाळ्यात मुलांना खूप त्रास आणि चिडचिड होऊ शकते.

सनस्क्रिन वापरा

उन्हाळ्यात बाहेर पडताना पालक आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सनस्क्रीन लावतात पण मुलांना सनस्क्रीन लावण्यासाठी विसरतो. मुलांना शाळेत जाताना किंवा खेळायला जाताना सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. हे लक्षात असू द्या की मुलांसाठी केवळ डॅाक्टरांनी सुचविलेले सनस्क्रिन वापरा.

सैल व सुती कपडे वापरा

मुलांची त्वचा झाकली जाईल तसेच हलक्या रंगाचे, सैलसर सुती कपडे घाला. हे त्यांच्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यास आणि त्यांना थंड ठेवण्यास मदत करतील.

केसांची स्वच्छता राखा

अंगाला जसा घाम येतो तसाच उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येऊन केस ओले होतात. यामुळे खाज येणे, घाम जास्त वेळ राहीला तर केस चिकट होणे आणि केसांत फोड येणे, वास येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून धुवावेत. मुलांना दिवसा घराबाहेर खेळायला पाठवताना डोक्यावर टोपी घालून पाठवा.

स्वच्छता राखा

मुलांना आंघोळ घालण्यासोबतच वेळोवेळी त्यांचे हात आणि चेहरा धुत राहा. याच्या मदतीने तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्ग होण्यापासून आळा बसेल.

जास्त पाणी पाजा

मुलांना संतुलित आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, अशा वेळी मुलांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. लहान मुलांना खूप लवकर निर्जलीकरण होते.

घाम पुसत रहा

उन्हाळ्यात बाळाला जास्त कपडे घालू नका.बाळाला काही काळ कपड्यांशिवाय ठेवा. लहान बाळाच्या त्वचेवर असलेला घाम किंवा तेल स्वच्छ कपड्याने पुसणं त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT