Skin Care: चेहरा उजळवण्यापासून ते केस लांबसडक आणि दाट करण्यासाठी कोरफड आहे फायदेशीर, वाचा सविस्तर

Aloe Vera Benefits: कोरफडीचे रोप अनेक घरांमध्ये सहज आढळते आणि त्याचा उपयोग त्वचा तसेच केसांच्या आरोग्यासाठी केला जातो. चला जाणून घेऊया त्याचे काही उपयोग.
Aloe Vera
चेहरा उजळवण्यापासून ते केस लांब आणि दाट करण्यासाठी कोरफड आहे फायदेशीर, वाचा सविस्तरSaam Tv
Published On

कोरफड हा स्वस्त आणि सहज उपलब्धक घटक आहे, जो आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि आयुर्वेदात त्याचा वापर औषधांमध्ये केला जातो. कोरफडीचा रस पिणे, जखमांवर लावणे आणि त्वचा-केसांसाठी विविध उपायांसाठी तो उपयोगी ठरतो.

नैसर्गिक गोष्टींचा वापर तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अधिक फायदेशीर मानला जातो. जरी सेंद्रिय गोष्टी हळूहळू काम करतात, तरी त्या चांगले परिणाम देतात आणि नुकसान होण्याची शक्यताही खूप कमी असते, म्हणूनच आजी घरगुती उपचारांचा खूप वापर करायच्या. त्वचा आणि केसांसाठी कोरफडीचे उपाय जाणून घेऊया.

Aloe Vera
Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

चेहऱ्यावर नैसगिक चमक वाढेल

चेहऱ्यावर नैसगिक चमक प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी तुम्ही कोरफडला व्हिटॅमिन सीच्या कॅपसुल सोबत मिसळून चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या पॅक का अठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा. हे वापरल्याने काही दिवसातच डाग, पुरळ कमी होतील आणि स्किन क्लिअर होण्यास मदत होईल.

केस सिल्की आणि शायनी बनतील

कोरफडीत हायड्रेटिंगचे गुण असतात. त्वचेसोबतच केसांना देखील ओलावा देतात. आणखी फायद्यांसाठी दही आणि अंड कोरफडमध्ये मिसळून ते केसांना लावा. हे लावल्यानंतर पहिल्याच वापरात तुम्हाला चांगला रिजल्ड मिळेल.

Aloe Vera
Hair Care: केस गळत आहेत? तर शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमी

कारडी त्वचा मऊ होईल

ज्या लोकांची त्वचा जास्त ड्राय असते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कोरफडमध्ये मध, गुलाबपाणी आणि दोन ते तीन चमचे खोबरेल तेल मिस्क करा. त्यामुळे त्वचा मऊ बनते आणि ड्रायनेस कमी होतो.

कोकफड कोंडा दूर करतो

केस गळण्याचं एक कारण म्हणजे कोंडा. त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी कोरफडमध्ये दही आणि लिंबू मिसळून ते केसांना लावू शकता. त्याशिवाय कोणत्याही कंपनीच्या सौम्य स्क्रबमध्ये थोडेसे कोरफडीचे जेल मिसळा आणि त्याने टाळूवर मसाज करा आणि नंतर केस धूवा. याने देखील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने लवकरच त्याचे परिणाम दिसू लागतील आणि कोंड्यापासून कायमची सुटका मिळेल.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com