ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोक केस गळतीमुळे त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळू शकतात.
केस गळती थांबवण्यासाठी लोक खूप महागडे प्रोडक्ट्स वापरतात.
केस गळतीसाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस गळतात ते जाणून घेऊया.
केसांसाठी व्हिटॅमिन डी खूप फायदेशीर आहे. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळतात.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास केस कमकुवत आणि पांढरे होऊ शकतात.
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस गळतात.
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि गळू शकतात.