ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जंक फूडमुळे मुलांना शारीरिक विकासात समस्या येतात आणि हाडांमध्ये कमकुवतपणा येतो. जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगला आहार द्यायचा असेल तर त्यांच्या आहारात या हेल्दी गोष्टीचा नक्की समावेश करा.
मजबूत हाडे आणि शरीराच्या तंदुरुस्तीसाठी, मुलांच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
दूध हे कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि शारीरिक वाढ होण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबत कॅल्शियम आणि आयरन देखील असते. जे मुलांच्या विकासासाठी फायदेशीर आहे.
कॅल्शियम आणि आयरनने समृद्ध असलेली नाचणी मुलांची हाडे मजबूत करण्यास तसेच त्यांची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
पांढऱ्या किंवा काळ्या तिळाच्या लाडूंचे सेवन केल्याने मुलांची हाडे मजबूत होतात.
शेवग्याची भाजी मुलांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. ज्यामुळे हाडे मजबूत होऊ शकतात.