ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही वेळा फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतं किंवा इंटरनेट पॅक संपतो. अशा वेळी ऑनलाईन पेमेंट करणे अशक्य होते. परंतु तुम्ही आता ऑफलाईन पद्धतीने देखील UPI पेमेंट करु शकता.
तुम्हाला माहीत आहे का, इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने UPI पेमेंट करु शकता. UPI ने पेमेंट करण्यासाठी ऑफलाईन पद्धत देखील सुरु केली आहे.
यासाठी तुमच्याकडे नेटवर्कसह सक्रिय फोन नंबर असणे आवश्यक आहे. तो फोननंबर UPI सेवांमध्ये नोंदणीकृत असावा. तसेच ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसै पाठवायचे असेल त्याचा UPI अॅड्रेस असणे आवश्यक आहे.
आता, तुमच्या फोनचा डायलर अॅप उघडा. त्यानंतर *99# डायल करा आणि कॉल बटण दाबा. फ्लॅश मेनू दिसेपर्यंत वाट पाहा. पैसे पाठवण्यासाठी १ पर्याय निवडा.
ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल त्या व्यक्तीचा फोननंबर किंवा UPI अॅड्रेस डायल करा.
जेवढी रक्कम पाठवायची असेल तेवढी टाइप करा यानंतर पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा पिन नंबर प्रविष्ट करावा लागेल.
UPI पेमेंट पूर्ण झाल्यानंतर,तुम्हाला पेमेंट पूर्ण झाल्याचा SMS प्राप्त होईल.