Child Care Tips Saam TV
लाईफस्टाईल

Phone Addiction: मोबाइलशिवाय मुलं जेवत नाहीत? मग 'या' सिंपल टिप्स लगेचच करा फॉलो

Parenting Tips: मुलांच्या मोबाईलच्या सवयीमुळे जेवणात त्रास होतोय? जाणून घ्या काही सोप्या टिप्स ज्या तुमच्या मुलांचं आरोग्य सुधारतील आणि सवयीही.

Saam Tv

लहान मुलांना मोबाईल हे आवडीचे खेळणे वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांना जेवताना, झोपताना तो हवा असतो. सध्या पालकांनाच मोबाईल हा चोवीस तास जवळ हवा असतो. हेच पाहून मुलं सुद्धा तो हट्ट करतात. मात्र मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या मानसिकतेवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. पालक कधी-कधी मुलांना शांत बसावं म्हणून स्वत:च मोबाईल देतात. (Children mobile addiction) त्याने मुलांना ही एक प्रकारची चटकचं लागते. लहान मुलांना युट्यूब, फेसबूक, इस्टा या गोष्टी पाहायला आणि स्क्रोल करत व्हिडीओ पाहायला प्रचंड आवडतात.

मोबाईल लहान मुलांपासून जितका लांब ठेवता येईल तितका ठेवावाच. त्याचसोबत पालकांनी सुद्धा लहान मुलांसमोर मोबाईल पाहणं टाळले पाहिजे. मोबाईलमुळे मुलं लहान असतानाच त्यांना डोळ्यांच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. (Child not eating due to phone)मेंदूवर सुद्धा याचा फार परिणाम होतो.

काही मुलं अशी असतात की, जे कार्टून पाहिल्या शिवाय जेवत नाहीत. अशा मुलांसाठी काही भन्नाट टिप्स पुढे दिल्या आहेत. ज्यांचा वापर करून पालक त्यांच्या मुलांचे आयुष्य आणि आरोग्य सुधारू शकतात.

मोबाईल टाळण्यासाठी सोप्या टिप्स

१. लहान मुलांना जेवण भरवताना मोबाईल त्यांच्या आजुबाजूला ठेवू नका. तसेच मुलांना एखादी गंभीर गोष्ट सांगून किंवा एखादे गाणे म्हणून जेवण भरवा.

२. लहान मुलांना जेवण भरवताना त्यांच्याशी गप्पा मारा. त्याने मुलांचे संवाद कौशल्य सुधारेल.

३. पालक जर मुलांसोबत जेवत असतील तर मोबाईल चुकूनही पाहू नका. कारण मुलं पालकांना पाहूनचं शिकत असतात.

४. लहान मुलांकडून फोन हिसकावून घेऊ नका. त्याऐवजी त्यांना स्क्रीन टाइम कमी करण्याची सवय लावा.

५. मुलांना मैदानी खेळ किंवा गार्डनमध्ये खेळायला घेऊन जा. त्याने मुलांची वाढ चांगली होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Doctor Warns: शरीरात दिसणारे हे 5 सामान्य बदल असू शकतात ब्लड कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

SCROLL FOR NEXT