Gudi Padwa 2025 date and significance sakal
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी? जाणून घ्या पद्धत, वेळ, आणि पारंपारिक विधी

Gudi Padwa rituals: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. १ जानेवारी हा दिवस वैश्विक नविन वर्ष मानला जात असला तरी, भारताच्या प्रत्येक राज्य आणि समुदायाचे स्वत:चे नविन वर्ष असते.

Saam Tv

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. १ जानेवारी हा दिवस वैश्विक नविन वर्ष मानला जात असला तरी, भारताच्या प्रत्येक राज्य आणि समुदायाचे स्वत:चे नविन वर्ष असते. असाच एक नविन वर्षाचा सण म्हणजे 'गुढी पाडवा'. हा सण महाराष्ट्र आणि गोवा, कोकणातील इतर भागात मोठा सण आणि महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या दारात गुढी उभारली जाते आणि तिची सह कुटुंबाने पूजा केली जाते. त्यात अनेक गृहीणींना नववधुंना गुढी कशी उभारायची हा प्रश्न सतावत असतो. आता आम्ही तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

गुढीपाडवा कधी आहे?

यंदा गुढी पाडवा ३० मार्च २०२५ रविवारी असणार आहे. हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येतो. हा मराठी लोकांसाठी नवीन वर्षाचा शुभारंभाचा दिवस आहे. या शुभ दिवशी कुटुंबातील सर्व लोक पहाटे अंघोळ करतात. घरात झाडलोट करतात, केरकचरा काढतात. सकाळी दारात सुंदर रांगोळी काढून, गुढी उभारतात. पण ही गुढी नेमकी कशी उभारायची त्याचे साहित्य काय? पुजा कशी करावी? याबद्दल आपण पुढील माहितीतून समजून घेणार आहोत.

गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी?

पाडव्याला घराच्या दारासमोर गुढी उभारून नविन वर्षाचे स्वागत केले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक उंच काठी, साडी किंवा ब्लाऊज पिस, साखरेच्या गाठींची माळ, कडूलिंबाची पाने, फुंलांनी विणलेला हार, तांब्याचा ताब्या, आंब्याची डहाळी, अष्टगंध, हळद-कुंकू, आरतीचे ताट इ.

गुढी कशी उभारावी?

सगळ्यात आधी बांबुची गाठी धुवून पुसून घ्या. मग काठीच्या वरच्या बाजुला किंवा टोकाला एक सुंदर साडी गुंडाळा. मग त्यावर कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठींची माळ बांधा. आता सर्व साहित्य काढीला बांधा आणि मग शेवटी कलश म्हणजेच तांब्या उपडा करून घट्ट बसवा. आणि नेहमी प्रमाणे त्याची पूजा करून दाराला गुंडाळा.

यंदाचा गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार यंदा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी दुपारी ४.२७ वाजता शुभ मुहूर्त सुरू होणार आहे. ही तारिख दुसऱ्या दिवशी ३० मार्च दुपारी १२.४९ वाजता संपणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT