प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावंस वाटतं. सुंदरता ही फक्त स्किन आणि त्वचेपुरती मर्यादीत नसते. यामध्ये तुमचे केस, डोळे आणि इतकेच नव्हे तर दातांवर सुद्धा अवलंबून असते. काही व्यक्तींचे दात आकाराने वेडेवाकडे असतात. तर काहींचे दात फार जास्त पिवळे असतात. दात पिवळे असल्यावर त्या व्यक्तीला ४ माणसांत उठण्याबसण्याची लाज वाटते. तसेच सर्वांसमोर खुलून हसता देखील येत नाही.
दात पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे असतील तर प्रत्येकाला ते आवडतात. अशी स्माइल पाहून अनेकदा काही व्यक्तींचा संपूर्ण दिवस सुद्धा छान जातो. त्यासाठी मीठ किंवा चारकोलचा वापर करून सुद्धा काही जण दात घासतात. मात्र हे निरर्थक ठरते.
दातांवरील पिवळेपणा घालवण्याचा खरा आणि अस्सल उपाय अनेक व्यक्तींना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हाच उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्हाला कोणताही डॉक्टर सुद्धा सहज सांगणार नाही. कारण याने अगदी २ मिनिटांत दात सोन्यासारखे लखलखीत चमकू लागतात.
कृती
सुरुवातीला एका वाटीत खोबरेल तेल घ्या. हे तेल आपल्याला अगदी तीन ते पाच थेंब इतकेच घ्यायचे आहे.
त्यानंतर तेलात एक चमचा बेकींग सोडा मिक्स करा.
बेकींग सोडा तेलात मिक्स केल्यानंतर आमध्ये एक चिमुट हळद सुद्धा मिक्स करून घ्या.
तसेच या संपूर्ण मिश्रणात आर्धी लिंबाची फोड पिळून घ्या.
लिंबू रस पेस्ट पातळ होण्यासाठी जितका आवश्यक आहे तितकाच अॅड करा.
पुढे या सर्वांमध्ये कोलगेटची पेस्ट मिक्स करा आणि दातांवर अप्लाय करा.
दात साफ करण्यासाठी तयार केलेली ही पेस्ट अतिशय गुणकारी आहे. याचा वापर करून तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.