rats  SAAM TV
लाईफस्टाईल

Home Remedy : उंदराला घरातून पळवण्याचा एकदम सोपा उपाय, फक्त एक बिस्टिक अन्...

viral home trick to remove rats : फक्त एका बिस्किटाच्या मदतीने घरातून उंदीर कायमचे पळवण्याचा जबरदस्त उपाय व्हायरल झाला आहे. बिस्किट, बेकिंग सोडा, विनेगर आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून उंदीर घराबाहेर पळतील.

Namdeo Kumbhar

how to get rid of rats naturally without poison : घरात उंदराचा सूळसुळाट झाला तर खाण्या-पिण्याच्या सामानाची नासाडी होतेच. त्याशिवाय फर्निचरही कुरतडले जातं. त्यामुळे घरातून उंदरांना पळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. मुंबई-पुण्यासारख्या शहरातील घरात तर उंदराचा जास्त उच्छाद असतो. पण याच उंदरांना घरातून पळवण्यासाठी अनेकजण उपाय शोधतात, पण मिळत नाही. उंदरांना घरातून कायमचं पळवण्याचा उपाय शिप्रा राय यांनी सांगितलाय, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बिस्किटासह फक्त तीन ते चार वस्तूंच्या मदतीने घरातून उंदीर कायमचा नाहिसा होईल. पाहूयात नेमकं काय आहे.. (home remedy for rats using vinegar and baking soda)

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये उंदराला घराबाहेर पळवण्याचा जुगाड सांगितलाय. बिस्किटाचा हा एकदम सोपा उपाय, तुम्हीही करू शकता. बिस्किट अन् किचनमधील काही साहित्यांच्या मदतीने घरातून उंदीर कायमचा नाहिसा होईल, असा दावा व्हिडिओत करण्यात आला. पाहूयात.. कोण कोणत्या वस्तू लागतील, अन् त्याचा वापर नेमका करायचा कसा..

एक बिस्किट

बेकिंग सोडा

विनेगर

मोहरीचे तेल

एक बिस्किट घ्या.. त्यावर अर्धा चमचा बेगिंक सोडा टाका अन् पसरवा.. त्यावर विनेगरचे काही थेंब टाका, एक मिनिटासाठी थांबा.. त्यानंतर त्यावर मोहरीचे तेल पूर्ण बिस्किटावर लावा. तेलाचं वास उंदाराला आकर्षित करेल अन् बाकीच्या वस्तू आपलं काम करतील.

हे तयार झालेले बिस्किट घरातील कोपऱ्यात, किचनमध्ये अथवा जिथे उंदीरे येतात अन् जातात, त्या भागात ठेवा. बिस्किट ठेवताना ते मुलं अथवा पाळीव प्राणी पोहचणार नाहीत अथवा पाहणार नाहीत अशी जागाच निवडा. यामध्ये कोणतेही विषारीपणा नाही, पण सावधगिरी बाळगणं कधीही चांगलं.

दरम्यान, बिस्किट ठेवण्यासोबतच घरातील साफ-सफाई नक्की करा. घरातील खाण्या-पिण्याच्या गोष्टी नेहमी झाकून ठेवा. कारण, उंदराला प्रत्येक ठिकाणी खाण्यासाठी मिळालं तर तो बिस्किटाकडे जाणारच नाही. महत्त्वाचे म्हणजे, या बिस्किटामुळे उंदीर मरत नाही तर वासामुळे घरातून पळ काढतो.

विनेगर आणि मोहरीच्या तेलामुळे उंदीर त्या बिस्किटाकडे आकर्षित होतो. उंदीर जेव्हा बिस्टिक खाईल त्यावेळी तो घराबाहेर पळ काढेल. कारण, बेकिंग सोडा पोटात गेल्यानंतर एसिटसोबत मिसळतो अन् गॅस तयार होतो. त्याला अस्वस्थ वाटतं अन् घराबाहेर पळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

SCROLL FOR NEXT