Office Work Load stress, Healthy Work life Saam Tv
लाईफस्टाईल

Office Work Load : ऑफिसचा वर्कलोड सहन होत नाहीये? या ४ टिप्स फॉलो करा, टेन्शन होईल दूर

Healthy Work life : हल्ली कामाच्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकांना वर्कलोड सहन होत नाही. कामाचा इतका ताण असतो की, जास्त व्यापामुळे आपण स्वत:ची काळजी नीट घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला अधिक ताण सहन करावा लागतो.

कोमल दामुद्रे

4 Tips To Reduce Stress :

हल्ली कामाच्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकांना वर्कलोड सहन होत नाही. कामाचा इतका ताण असतो की, जास्त व्यापामुळे आपण स्वत:ची काळजी नीट घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला अधिक ताण सहन करावा लागतो.

कामाचा ताळमेळ जुळत नसेल तर आपल्याला अधिक मानसिक त्रास (Mental Stress) होतो. तसेच यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. काम (Worked) कसे संपवायचे, मॅनेज कसे करायचे अशा गोष्टी सुरु असतात. तसेच काम लगेच संपवण्याच्या नादात आपण अति घाई केली की ते आणखी उशीरा होण्याची किंवा चुकण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला कामाचा वर्कलोड सहन होत नाहीये तर या ४ टीप्स (Tips) फॉलो करा.

1. वेळेनुसार कामाचे विभाजन

तणाव आणि चिंता टाळण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचे व्यवस्थित नियोजन करा. घर आणि कामाचे नियोजन कसे करता येईल यावर भर द्या.

2. झोपे घेणे महत्त्वाचे

जर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तर आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शरीर दिवसभरातील ताणतणाव आणि दबावापासून स्वत:ला डिटॉक्स करते. त्यासाठी रात्री शांत ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

3. चर्चा

स्वत:शी चर्चा करा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुम्हाला व्यक्त होण्याची संधी मिळते. त्यासाठी तुम्ही कामाविषयी किंवा आलेल्या ताणाविषयी चर्चा करा. ज्यामुळे ताण कमी होईल. तुमच्या दिवसाबद्दल तुमचा सहकारी, मित्र आणि कुटुंबियांशी बोला.

4. ध्यान करा

दररोज सकाळी ध्यान करा. खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. लक्ष एका जागी केंद्रित करा. यामुळे तणाव कमी होईल. श्वास घेताना, चालताना किंवा खाताना लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भीषण! ट्रकखाली चिरडून तरुण इंजिनिअरचा जागीच मृत्यू, घटनेचा CCTV व्हायरल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर येथे गोकुळच्या डिबेंचर कपाती विरोधात दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा

Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

Diwali Mithai Recipe: बाजारात मिळणारी मिठाई आता घरीच बनवा, या आहेत ४ चविष्ट रेसिपी

ManaChe Shlok: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘मनाचे श्लोक'चं नाव बदललं; 'या' नव्या नावासह होणार चित्रपट प्रदर्शित

SCROLL FOR NEXT