metabolism slowdown google
लाईफस्टाईल

Belly Fat: पोटावरील घेर वाढतोय? एक सवय ठरतेय नुकसानदायक, स्लिम होण्यासाठी आताच करा बदल

Weight Loss Tips: उशिरा जेवण्याची सवय तुमच्या पोटावर चरबी वाढवते. योग्य वेळी आहार घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारतो, वजन नियंत्रणात राहते आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी ही सवय त्वरित बदलणे गरजेचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

Belly Fat Tips: तुमच्या रोजच्या चुकांमुळे तुमच्या पोटाचा घेर वाढत असतो. त्यामुळे तुमच्या रोजच्या जीवनशैलीत तुम्ही योग्य प्रकारे बदल करणे गरजेचं आहे. कारण एकदा फॅट वाढत गेला तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. कारण फॅट वाढताना सुरुवातीला काही जाणवत नाही. पण याने तुमच्या शरीरातले अनेक भाग फुगलेले दिसतात. याचा परिणाम तुमच्या ह्रद्यावर सुद्धा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात यावरील प्रभावी उपाय आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या चूका.

वजन वाढण्याचं मूळ कारण काय?

सगळ्यात आधी आपण आपला पोटाचा घेर किंवा शरीरातली चरबी कशी वाढते? हे समजून घेणं गरजेचं आहे. तर वाढत्या फॅटची प्रक्रिया शरीराच्या एनर्जी बॅलेन्सशी जोडलेली असते. जेव्हा तुम्ही सेवन केलेली एनर्जी म्हणजे कॅलरीज खर्च जास्त खर्च करता. तेव्हा शरीरात उरलेली ऊर्जा फॅटमध्ये रुपांतरीत होऊन साठते. त्यामुळे फॅट आणि वजनात हळूहळू वाढ होते.

कोणत्या सवयींमुळे फॅट वाढतो?

सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटतं की, घरचं खाल्याने वजन वाढत नाही. पण मुळात हा गैरसमज आहे. यातली एक चूक म्हणजे तुमची वेळ. जर तुम्ही घरात बनवलेलं जेवण रात्री १० ला किंवा त्यापेक्षा उशीरा खाता. तेव्हा तुम्हाला वाढत्या चरबीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

शरीरात होणारे महत्वाचे बदल कोणते?

काही महिलांना सगळ्यांच्या शेवटी जेवायला आवडतं. त्यांच्यात काही दिवसांनी वाढलेला फॅट दिसतो. याचे कारण म्हणजे, रात्रीच्या वेळेस शरीरातलं मेटाबॉलिज्म कमी होत जातं, सोबत इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी (Insulin Sensitivity) सुद्धा कमी होते. याचमुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया बंद होते. याचा परिणाम तुमच्या पोटावर तुम्हाला दिसतो.

तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळेत बदल करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या वाढत्या फॅटचं कारण हीच एक तुमची सवय आहे. त्यामुळे जमल्यास ७ ते ७.३० या वेळेतच तुम्ही जेवण करा. कारण या वेळेस फॅट मेटाबॉलिजम योग्य प्रकारे काम करत असतो. याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai heatwave: उष्णतेने मुंबईकर पडले आजारी; पोटाच्या आजारांचे रूग्ण ५० टक्क्यांनी वाढले

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ; बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणार, अॅडव्हान्स बुकिंगसाठी धडाकेबाज सुरुवात

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यामध्ये 45.1° उचांकी तापमानाची नोंद

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! माजी मंत्र्याने शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला धनुष्यबाण, राष्ट्रवादीला खिंडार

Shreya Bugde Photos: 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेचं कॉटन हिरव्या साडीत फोटोशूट

SCROLL FOR NEXT