Manasvi Choudhary
गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे घराघरांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. बाप्पाच्या आगमनानंतरचे ५ दिवस घरोघरी विविध नैवेद्य, फराळ आणि पारंपरिक जेवण बनवले जाते.
या दिवसांत आहारात पारंपरिक आणि पौष्टिक भाज्यांचा समावेश केल्यास चवच नाही तर आरोग्यालाही फायदे होतील. मात्र या गावरान भाज्या नेमक्या कोणत्या आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
गणपतीत अळुच्या पानांची भाजी, वडे बनवले जातात. तुम्ही देखील अळूच्या पानांचे फदफदं ही रेसिपी ट्राय करू शकता. पचनासाठी हलकी ही भाजी असते.
गावरान स्टाईल मेथीच्या भाजीमध्ये पौष्टिक घटक असतात. चवीला कडू असणारी ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही गणपतीच्या काळात नक्की बनवा.
लाल माठाची भाजी गावरान भाजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा मुगाची डाळ घालून बनवा.
भरलेली भेंडीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. भेंडीमधील गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
हिरवी चवळीची भाजी किंवा चवळीच्या पानांची भाजी ही चवदार आणि पौष्टिक असतो. याभाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो.