Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रामध्ये घरातील गोष्टींच्या जागेविषयी आणि मांडणीविषयी महत्वाचे नियम सांगितले आहे.
वास्तुशास्त्रात,घराच्या दरवाज्याशी संबंधित 5 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा योग्य दिशेला असावा. उत्तर, पूर्व किंवा ईशान्या ही दिशा मुख्य दरवाज्यासाठी शुभ मानली जाते या दिशेने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज होत असेल, तर वास्तूच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते यामुळे घरात मानसिक ताणतणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते यासाठी दरवाजा वेळीच दुरूस्त करून घ्या
घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असावा. मुख्य दरवाज्यासमोर कधीही कचरापेटी, तुटलेल्या वस्तू किंवा जुन्या चपलांचा ढीग पडू देऊ नका.
मुख्य दरवाज्याला आकर्षक बनवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी त्यावर कुंकवाने किंवा शुभ चिन्हाने 'स्वस्तिक किंवा 'ओम' काढा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.