Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराच्या जागेविषयी आणि मांडणीविषयी नियम सांगितले आहेत. घरातील प्रत्येक खोलीची आणि वस्तूची एक निश्चित दिशा ठरलेली असते, जी घरात सकारात्मक उर्जा देते.
घरात जर टॉयलेट चुकीच्या दिशेला असेल, तर घरात वास्तुदोष निर्माण होऊन आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार घरातील टॉयलेटची योग्य जागा आणि दिशा कोणती असावी? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, घरात टॉयलेट वायव्य दिशेला असणे शुभ मानले जाते. ही दिशा विसर्जन आणि कचरा बाहेर टाकण्यासाठी योग्य आहे.
घराच्या अगदी मधोमध कधीही टॉयलेट नसावे. यामुळे घरातील सकारात्मक उर्जा नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते.
टॉयलेटचे दार हे हॉल किंवा स्वयंपाकघरासमोर नसावे. हे लक्षात घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.