Manasvi Choudhary
सकाळी उठल्याबरोबर किंवा कामाचा ताण आल्यावर कडक चहा किंवा कॉफी पिणे अनेकांसाठी एक न सुटणारी सवय असते. चहा-कॉफीमुळे मूड फ्रेश होतो.
चहा - कॉफी बनवण्यासाठी साखर वापरतात ही साखर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यासाठी पुढील ३० दिवस म्हणजे महिनाभर तुम्ही बिनसाखरेची चहा- कॉफी प्यायल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या
साखरेमध्ये कॅलरीज वाढवण्याचे प्रमाण अधिक असते. महिनाभर साखर खाणं बंद केल्यामुळे शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण झपाट्याने कमी होते, ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
गोड पदार्थांमुळे पचनसंस्था मंदावते. चहा-कॉफीमध्ये साखर घालणे बंद केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके राहते.
साखरेच्या अतिसेवनामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो, ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. साखर बंद केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
बिनसाखरेचा चहा प्यायल्याने ऊर्जा एकदम वाढते आणि कमी होते ज्यामुळे थकवा आणि चिडचिड होते. साखर नसलेला चहा प्यायल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
साखरेमुळे तोंडात जिवाणूंची वाढ होऊन दातांची झिज आणि किडणे यांसारख्या समस्या होतात. साखर नसलेला चहा प्यायल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहतात.
साखरेमुळे रात्रीच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. साखर टाळल्याने मेंदू शांत राहून रात्री उत्तम आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.