Sakshi Sunil Jadhav
सध्या देशभरात तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे गरमीचा त्रास वाढला आहे. अशावेळी पंखाही गरम हवा देतो. पण काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही AC शिवायही खोली थंड ठेवू शकता.
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पंख्यासमोर ओला टॉवेल लटकवा टेबल फॅनसमोर थंड, ओला टॉवेल ठेवा. याने हवा थंड येते.
पाण्याच्या बाटल्या फ्रीजरमध्ये गोठवून पंख्यासमोर ठेवा, थंड हवा मिळेल. तसेच रुममधली उष्ण हवा कमी होईल.
एका भांड्यात बर्फ आणि थोडं मीठ घालून पंख्यासमोर ठेवा. याने रुममधली हवा लगेचच थंड होते.
सीलिंग फॅन उलट (counter-clockwise) फिरत असेल तर थंड हवा खाली येते. त्यामुळे त्याची दिशा बटणाद्वारे बदला.
संध्याकाळी खिडक्या-दारं उघडी ठेवा, थंड हवा आत येते. जास्त वेळ घर बंद राहील्याने घरात उष्णता वाढते आणि कुबट वास येतो.
बाहेरची थंड हवा आत खेचण्यासाठी पंखा खिडकीजवळ ठेवा. थोडा वेळ जरी ही ट्रीक केली तरी तुम्हाला फायदा होईल.
दुपारी खिडक्यांना जाड पडदे लावल्याने उष्णता आत येत नाही. या सोप्या ट्रीक फॉलो करुन तुम्ही घरात थंड हवा मिळवू शकता.