Early stomach cancer warning signs SAAM TV
लाईफस्टाईल

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Early cancer symptoms: कॅन्सर हा आजार जगभरात वाढत चालला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे ओळखली गेली तर उपचार सोपे होतात आणि जीव वाचवता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढत असून हा एक गंभीर आजार मानला जातोय. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या आकडेवारीनुसार 2022 या वर्षामध्ये जगभरात जवळपास 19,976,499 कॅन्सरच्या प्रकरणांचं निदान करण्यात आलंय. यापैकी 10,311,610 पुरुष आणि 9,664,889 महिलांना हे निदान झाल्याचं समजलं.

2024 मध्ये आलेल्या अनेक अहवालांनुसार, त्या वर्षात जगभरात 19 दशलक्षाहून अधिक नवीन कॅन्सरच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहिली तर कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सतत वाढ होतेय.

कॅन्सरचं वेळेत निदान झालं की, त्याचे उपचारही वेळेत होऊन व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होते. वेळेवर निदान करून घेण्यासाठी तपासण्या करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय काही कॅन्सरपूर्वी काही लक्षणं दिसून येतात ही लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.

सततचा थकवा

सतत येणारा थकवा हे कॅन्सरचं दुर्लक्षित केलं जाणारं एक लक्षण आहे. हा थकवा तुमच्या दररोजच्या थकव्यापेक्षा जास्त असतो. चांगला आहार, पूर्ण झोप घेऊनही हा थकवा जात नाही. २०२२-२४ च्या डाटानुसार, ३० टक्के कॅन्सर रूग्णांना सततच्या थकव्याची समस्या जाणवते.

तीव्र वेदना

जर एखादी वेदना दीर्घकाळ राहत असेल तर ती कॅन्सरमुळे असू शकते. यामध्ये पाठीचा त्रास हा स्वादुपिंडाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसून येतो. हाडांचा त्रास हा कॅन्सर शरीरात पसरल्यावर दिसणारं लक्षण आहे.

त्वचेमध्ये बदल होणं

प्रत्येक कॅन्सर हा शरीराच्या आतच तयार होतो असं नाही. काही कॅन्सरची सुरुवात तुमच्या त्वचेवर ही दिसून येऊ शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बदल जाणवू शकतात. यामध्ये चामखीळ येणं, न भरणाऱ्या जमखा होणं किंवा पुरळ येण्याची समस्या होऊ शकते.

शौचाच्या सवयींमध्ये बदल

जर शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवला आणि लघवीमध्ये रक्त दिसून आलं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कोलोरेक्टल, Bladder आणि प्रोस्टेटचा कॅन्सर अनेकदा छोट्या लक्षणांपासून सुरू होतो.

गाठी

प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असेलच असं नाही. कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये गाठींचा देखील समावेश आहे. स्तनाचा कॅन्सर आणि अंडकोषाचा कॅन्सर यांचं निदान बहुतेक वेळा गाठींमुळेच होतं. स्वतः तपासणी केली असता या गाठी तुम्हाला समजू शकतात.

न थांबणारी डोकेदुखी

डोकेदुखीमागे काही न्यूरोलॉजीकल गोष्टीही कारणीभूत असू शकतात. मात्र मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास रूग्णाला डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी.

अचानक वजनात घट होणं

ऑन्कोलॉजिस्टच्या सांगण्यानुसार, नुकतंच निदान झालेल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि लंग कॅन्सरच्या रुग्णांपैकी 40% हून अधिक लोकांना त्यांच्या वजनात घट झाल्याचं दिसून आलं होतं. कॅन्सरच्या ट्यूमरमुळे होणाऱ्या मेटाबॉलिक बदलांमुळे वजन कमी होतं.

सततचा खोकला

खोकल्याचा त्रास हा व्हायरस आणि फ्लू मध्ये जरी होत असला तरी तो कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर तुमचा खोकला सतत राहत असेल आणि कमी होत नसेल तर तो गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT