त्वचेवरील पिवळेपणा हे लिव्हरच्या बिघाडाचं पहिलं मोठं लक्षण आहे.
स्पायडर अँजिओमा आणि तळहात लाल होणे लिव्हर हार्मोन्स असंतुलित असल्याचे संकेत आहेत.
रॅश नसतानाही सतत खाज येणे हे गंभीर लिव्हर समस्या असू शकते.
लिव्हर डिसीज अनेकदा शांतपणे वाढत जातं. सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही मोठी लक्षणं दिसत नाहीत. पण आपल्या शरीरातला सर्वात मोठं लक्षण अनेकदा त्वचेवर दिसतं. हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड प्रशिक्षित हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, त्वचेवर दिसणारे काही सूक्ष्म बदल हे लिव्हरमध्ये सुरू असलेल्या गंभीर प्रक्रियेची सुरुवात असू शकतात.
लिव्हर व्यवस्थित काम न करता बिलीरुबिन पचवू शकत नसल्याने त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसणे हे सर्वात पहिलं स्पष्ट लक्षण मानलं जातं. तज्ज्ञ सांगतात की, अचानक दिसणारा पिवळेपणा हे हिपॅटायटीस, पित्त नलिकेत अडथळा किंवा प्रगत लिव्हरचा आजार हे संकेत असू शकतात. त्यामुळे हे लक्षण दिसताच तात्काळ वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.
त्वचेवर लाल, कोळीच्या जाळ्यासारखे दिसणारे रक्तवाहिन्यांचे छोटे क्लस्टर्स म्हणजे spider angiomas ही देखील चिंतेची निशाणी आहे. हे बऱ्याचदा चेहरा, मान, छाती किंवा हातांवर दिसतात. लिव्हर हार्मोन्स योग्य प्रकारे मेटाबॉलिज करू शकत नसल्यामुळे इस्ट्रोजन वाढतं आणि ही स्थिती निर्माण होते. अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये हे जास्त दिसते. अचानक यांचा उगम होत असेल तर ते लिव्हर फेल्युअरचं लक्षण मानलं जातं.
तळहातांवर लालसर डाग दिसणे हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे. विशेषतः अंगठ्याच्या आणि करंगळीजवळ लाल छटा दिसतात. बरेचजण हे उष्णतेमुळे किंवा allergy मुळे होतं असं समजतात, पण तज्ज्ञांच्या मते हे इस्ट्रोजनच्या वाढीमुळे आणि रक्तप्रवाहातल्या बदलांमुळे होतं आणि फॅटी लिव्हर, सिरोसिस किंवा ऑटोइम्यून हिपॅटायटीसच्या सुरुवातीचे संकेत असू शकतात.
शरीरावर आणि विशेषत: हातावर कुठलाही रॅश नसताना सतत खाज येते, विशेषतः रात्री वाढणारी, ही देखील लिव्हरमधील गंभीर बिघाड झाल्याचे संकेत देते करते. तज्ज्ञ सांगतात की त्वचेवरील अशी लक्षणं हलक्यात घेऊ नयेत. लिव्हर हा शरीरातील महत्वाचा अवयव असल्याने त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात. संतुलित आहार, अल्कोहोलचे नियंत्रण, व्यायाम आणि नियमित चेकअपद्वारे लिव्हर हेल्थ राखणं गरजेचं आहे. पण त्वचेवर ही कोणतीही चिन्हं दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.