Olympiad Exam Saamtv
लाईफस्टाईल

अशा प्रकारे मुलांना ऑलिम्पियाडसाठी तयार करा, पालकांनी या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात

जर तुमचं मूल ऑलिम्पियाडची तयारी करत असेल तर तुम्ही त्याला मदत करण्यासाठी काही पद्धती वापरू शकता. त्यामुळे त्यांना त्याची सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळांमध्ये ऑलिम्पियाड परीक्षा किंवा स्पर्धा घेतल्या जातात ज्यात मुले मनापासून भाग घेतात. या ऑलिम्पियाड्स बहुतेक विज्ञान आणि गणिताच्या असतात. यामध्ये मुलांच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांचा स्मार्टनेस आणि मनाची तायारी ही बघतात. जर तुमचे मूल शाळेत ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी करत असेल, तर पालक म्हणून तुम्ही त्याला अनेक प्रकारे मदत करू शकता. विशेषत: लहान मुलांना पालकांच्या मार्गदर्शनाची गरज असते. अशा परिस्थितीत येथे दिलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील. 

रणनीती बनवणे

कोणत्याही स्पर्धेची तयारी करताना रणनीती बनवणे गरजेचे असते. कोणत्या वेळी अभ्यास करायचा, किती वेळ अभ्यास करायचा, आधी काय लक्षात ठेवायला हवं, सराव करणं जास्त महत्त्वाचं आणि नंतर कोणत्या गोष्टी सोडल्या जाऊ शकतात, याचं नियोजन करणं गरजेचं आहे.

समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा 

ऑलिम्पियाडमध्ये नुसत्या गोष्टी लक्षात ठेवणे किंवा रट्टा मारणे चालत नाही. त्यासाठी समजून घेण्यावर भर देणे गरजेचे आहे. मुलाला जे समजत नाही ते प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तो ऑलिम्पियाडमधील कोणताही प्रश्न सोडविण्यास तयार असेल.

सरावानेच परिपूर्णता

कोणताही प्रश्न किंवा चाचणी (ऑलिम्पियाड मॉक टेस्ट) एकदाच करून थांबू नका. पुन:पुन्हा सराव करूनच परिपूर्णता मिळवता येते. यामुळे गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यास मदत होतेच, शिवाय ऑलिम्पियाडदरम्यान मेंदूही वेगाने काम करू लागतो आणि विचार करण्यात जास्त वेळ घालवत नाही. 

सातत्य महत्वाचे

ऑलिम्पियाडसाठी, एका दिवशी तासनतास अभ्यास करणे आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे करणे असं चालत नाही. सातत्य राखणे फार महत्वाचे आहे. दररोज कमी तास वाचन केले तरी दररोज तेवढाच वेळ आणि त्याच समर्पणाने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये सातत्य राहिल्यास त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते. 

ग्रुप स्टडी

ग्रुप स्टडी दररोज करण जमल नाही तर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. ऑलिम्पियाडची तयारी करणाऱ्या इतर मुलांसोबत बसून सराव करणे देखील तुमच्या मुलासाठी फायदेशीर ठरू शकते. याद्वारे मुलाला प्रश्न सोडवण्याचे वेगवेगळे मार्ग समजू शकतात आणि इतर मुलांशी स्पर्धा करण्याची आणि पुढे जाण्याचा उत्साह भरते.

Edited by- Archana Chavan

Tata Punch: फक्त 1 लाखात घरी आणा टाटाची दमदार कार; लोनवर किती भरावे लागेल EMI

Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?

Maharashtra News Live Updates: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

Sharad Pawar News : भर सभेत शरद पवारांना मिळाली चिठ्ठी! पुढे जे झालं ते, पाहा Video

Mohammed Shami: कमबॅक असावं तर असं.. 360 दिवसांनंतर मैदानात उतरला अन् पहिल्याच सामन्यात राडा केला

SCROLL FOR NEXT