Saree Beach Shoot Saam TV
लाईफस्टाईल

Saree Beach Shoot : साडी नेसून बीचवर फोटोशूट कसं करायचं? करिश्माने थेट करून दाखवलं, पाहा VIDEO

Saree Poses On Beach : समुद्रकिनारी फोटो क्लिक करताना साडी ओली होते आणि मग संपूर्ण वेळ ओल्या साडीमध्येच रहावं लागतं. त्यामुळेच करिश्मा धीरज या ताईने यावर तोडगा काढला आहे.

Ruchika Jadhav

बीचवर समुद्रकिनारी फिरायला जाण्यासाठी कोणत्याही स्पेशल सीजनची गरज नसते. उंच उंच लाटा आणि वाळूमध्ये फोटोशूट करताना साडीवर मुली फारच सुंदर दिसतात. तसेच सध्या समुद्रकिनारी फिरताना साडीवर फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू आहे.

समुद्रकिनारी कायम सोसाट्याचा वारा जाणवतो. तसेच वाळू आणि पाणी यामुळे काही मुलींची प्रचंड चिडचीड होते. त्यांना साडीवर फोटो क्लिक करायचे असतात. मात्र साडी ओली होते आणि मग संपूर्ण वेळ ओल्या साडीमध्येच रहावं लागतं. त्यामुळेच करिश्मा धीरज या ताईने यावर तोडगा काढला आहे.

करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने ही सर्व माहिती दिली आहे. समुद्रकिनारी साडी नेसून फोटोशूट करण्याच्या तिने काही टिप्स सांगितल्या आहेत. त्याच टिप्सची माहिती आज जाणून घेणार आहोत.

साडीची निवड

करिश्माने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, सर्वात पाहिले योग्य साडीची निवड केली पाहिजे. समुद्रकिनारी फिरताना कधीच डायमंड किंवा नक्षीकाम केलेली साडी नेसू नका. ही साडी फार जड असते. त्यामुळे समुद्रकिनारी कायम साधी, प्लेन, कॉटन, सिल्क अशा फॅब्रिकमधली साडी निवडा.

क्रॉप टॉप आणि स्कर्ट

साडी नेसताना एखादा क्रॉप टॉप आणि स्कर्ट निवडा. त्यावर तुम्ही साडी नेसू शकता. पाण्यात फोटोशूट करताना साडी ओली होते. अशावेळी तुम्हाला साडी सुकेपर्यंत तिथे थांबण्यासाठी वेळ नसेल तर साडी काढून तुम्ही क्रॉप टॉप आणि स्कर्टवर घरी येऊ शकता.

करिश्माने महिलांसाठी हा सिंपल व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये तिने तुम्ही प्रिवेडींग शूटसाठी सुद्धा असं करू शकता हे सांगितलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल

Yoga Poses For Neck Pain: महिलांनी नियमित करा हे ५ योगा, मानेचं दुखणं होईल कायमचं कमी

हाडांमधून कट-कट आवाज का येतो? यावर काय उपाय केले पाहिजेत?

Lipstick Application Tips : ओठांवर परफेक्ट लिपस्टिक कशी लावावी? जाणून घ्या पध्दत

Parth Pawar : राजकीय घडामोडींना वेग! पार्थ पवार अन् सुप्रिया सुळे यांच्यामध्ये २ तास चर्चा अन्...

SCROLL FOR NEXT