Manasvi Choudhary
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण मोठ्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
कुटुंबासह महिला पारंपारिक पध्दतीने गुढी उभारून हा सण साजरा करतात.
गुढीपाडव्यानिमित्त महिला खास तयारी करतात.
पारंपारिक महाराष्ट्रीयन साडीलूकवर सुंदर दिसण्यासाठी महिला दागिने घालतात.
गळ्याभोवती घातला जाणारा हा दागिना प्रत्येक महिलेच्या सौंदर्यात भर घालतो.
दोन किंवा तीन पदरी बोरमाळ काठपदरी साडीवर फारच खुलून दिसते.
महाराष्ट्राची विशेषता असणारी बुगडी ही कानामध्ये झुमक्याच्या वर घालू शकता.
एक, दोन किंवा तीन पदरी राणी हार घातल्याने पूर्ण गळा भरल्यासारखा दिसतो.
नथीशिवाय मराठमोळ्या सौंदर्याला शोभा नाही.