Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Recipe : पौष्टिक व खमंग थालीपीठाची चव चाखायची आहे तर, आजच ट्राय करुन पहा

वाढत्या वयात मुलांना अधिक पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे त्याच्या आहारात आपण पौष्टिकतेने भरलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा.

कोमल दामुद्रे

Recipe : सध्या गणेशोत्सवानिमित्त मुलांना शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालकांचे टेन्शन वाढले आहे. गणेशोत्सव म्हटलं की, मुलांना सतत गोडाचे पदार्थ खायला आवडतात.

या काळात आपण अनेक गोडाच्या पदार्थांची चव चाखत असतो परंतु, सतत गोड खाऊन देखील कंटाळा येतो किंवा मुले (Child) गोडामुळे तिखट खाणे सोडून देतात. वाढत्या वयात मुलांना अधिक पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे त्याच्या आहारात आपण पौष्टिकतेने भरलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यासाठी जाणून घेऊया खमंग अशा थालीपीठाची रेसिपी

साहित्य -

ज्वारी, बाजरी, गहु, बेसन, तांदळाचे पीठ - प्रत्येकी एक एक वाटी

हळद - १/४ चमचा

हिंग - १/४ चमचा

धणे पावडर - १ चमचा

जीरे पावडर - १ चमचा

लाल मिर्ची पावडर - १ चमचा

ओवा - १/२ चमचा

सफेद तीळ - २ चमचे

आलं, लसूण व मिरच पेस्ट - २ चमचे

मीठ

तेल (Oil)

बारीक चिरलेला कांदे - ३

बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी

कृती -

१. सर्वप्रथम सगळे पीठ एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्यात हळद, हिंग, धणेपूड, जीरेपूड, लाल तिखट, ओवा, आलं, लसूण व मिरच पेस्ट, बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.

२. त्यानंतर त्यात मीठ व पाणी घालून चांगले मळून घ्या. त्यावर थोडे तेल व तीळ घालून पुन्हा मळून घ्या.

३. नंतर सुती कापड ओला करुन तो पोळपाटावर ठेवा. तयार पीठाचा गोळा घेऊन त्याला भाकरीसारखे थापा.

४. त्यानंतर तयार झालेल्या थालीपीठाला मध्यभागी होल करा व तव्यावर भाजण्यास ठेवा. होल केलेल्या थालीपीठात हळूहळू तेल घालून चांगले भाजून घ्या व दह्यासोबत सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : राज्यात थंडी ओसरली, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, वाचा हवामान विभागाचा इशारा

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

Til Ladoo Recipe : तिळाचे लाडू नेहमी कडक होतात? ट्राय करा 'ही' रेसिपी

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

Famous Actress Wedding : 'क्यूंकी सास भी...'; फेम अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा खास PHOTOS

SCROLL FOR NEXT