Besan Bhindi Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Besan Bhindi Recipe : कितीही चांगली बनवली तरी भेंडी चिकट होते ? मग याप्रकारे ट्राय करुन पाहा, बनेल टेस्टी

How To Make Besan Bhindi : भेंडीच नाव जरी काढले तरी मुल नाक मुरडत असतील तर आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

Bhindichi Bhaji Kashi Banval : भेंडीची भाजी म्हटलं की तिच्या चिकटपणामुळे अनेकांच्या नाकी नऊ येतात. कितीही चवदार पद्धतीने बनवली तरी ती चिकटच होते. भेंडी आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते. पण भेंडीच नाव जरी काढले तरी मुल नाक मुरडत असतील तर आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.

मुलांना आवडेल व ती पौष्टिक चविष्ट भाजीची चव मुलाच्या पोटात जाण्यासाठी तुम्ही कुरकुरीत अशी बेसन भेंडी मुलांना खाऊ घालू शकता जर तुम्हाला ही डिश बनवायची असेल तर तुम्ही येथे दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

1. साहित्य

  • भेंडी - 1/2 किलो

  • बेसन - 3 चमचे

  • कांदा किसलेला - 2-3 चमचे

  • आले-लसूण पेस्ट - 1/2 टीस्पून जिरे

  • बडीशेप-1 टीस्पून

  • हिंग - 1 टीस्पून

  • गरम मसाला - 1/4

  • कोथिंबीर - 2 -3 टीस्पून

  • हळद (Turmeric) - 1/4 टीस्पून

  • लाल तिखट - 3/4 टीस्पून

  • धणे पावडर - 1/2 टीस्पून

  • जिरे पावडर - 1/4 टीस्पून सुका

  • आमचूर पावडर - 1 टीस्पून

  • तेल (Oil) - 3 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

2. कृती

  • कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात भेंडी घेऊन ती चांगली धुवावी. पाणी (Water) निघाल्यावर त्यांना लांब असे कापून घ्या.

  • आता एका भांड्यात हळद, धणेपूड, लाल तिखट, जिरेपूड, आमचूर पावडर आणि थोडे मीठ घालून सर्व मसाले एकत्र करा.

  • आता हे सर्व मसाले एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि त्यात चिरलेली भेंडी घाला. 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा.

  • आता कढईत तेल टाकून मंद आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, बडीशेप आणि चिमूटभर हिंग घालून परतून घ्या.

  • आता त्यात किसलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. काही वेळाने या मसाल्यांमध्ये 2-3 चमचे बेसन घालून तळून घ्या.

  • बेसन साधारण ५-६ मिनिटेच तळले जाईल. यासाठी बेसनाला सुगंध आल्यानंतर काढून घ्या

  • यानंतर, त्यात कांद्या- बेसनच्या मिश्रणात मसाला लेप केलेली भिंडी घाला आणि चांगले मिसळा.

  • यानंतर पॅन झाकून ठेवा आणि 10-12 मिनिटे भेंडी शिजू द्या.

  • भेंडी शिजून कुरकुरीत झाल्यावर त्यावर गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून सजवा आणि त्यानंतर गॅस बंद करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT