Stuffed Karela Recipe : मधुमेह, वाढत्या साखरेवर फायदेशीर आहे भरलेले कारले; याप्रकारे बनवा कधीच लागणार नाही कडू, पाहा रेसिपी

Karela Benefits for Diabetes : कडू कारल्यामुळे आपण त्याचा आहारात वापरही कमी प्रमाणात करतो.
Stuffed Karela Recipe
Stuffed Karela Recipe Saam Tv
Published On

Bharleli Karli : कारले म्हटले की अनेकजण नाक मुरडतात तर काही जण आवडीने खातात. कडू कारल्यामुळे आपण त्याचा आहारात वापरही कमी प्रमाणात करतो. त्याच्या कडूपणामुळे व चवीमुळे कारले अनेकांना आवडत नाही.

कारल्यामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ब -१, ब-२ व ब-३ आणि जीवनसत्त्व क चा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये लोह व कॅल्शियम देखील आढळते. पण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व मधुमेहासाठी (Diabetes) कडू कारले अतिशय फायदेशीर समजले जाते.

Stuffed Karela Recipe
Dal Tadka Recipe : तडका डाळ बनवण्याच्या 4 सोप्या पद्धती, याप्रकारे फोडणी द्या; परफेक्ट ढाब्यासारखी चव मिळेल

परंतु, या कारल्याची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी व मुलांनी ते आवडीने खाण्यासाठी आपण त्याची बनवण्याची पद्धत बदली तर त्याची चव अधिक छान लागते. चला जाणून घेऊया भरलेले कारले (bitter gourd) बनवण्याची योग्य पद्धत

1. साहित्य

  • कारले - 8 ते10

  • जिरे - 1/2 टीस्पून

  • हळद (Turmeric) - 1/2 टीस्पून

  • शेंगदाण्याचा कूट - 8 ते 10 चमचे

  • बेसनाचे पीठ- २ चमचे

  • बडीशेप पावडर - 2 टीस्पून

  • लाल तिखट - 1/2 टीस्पून

  • धणे पावडर - 2 टीस्पून

  • हिंग- 1 चिमूटभर

  • आमचूर पावडर- 1 टीस्पून

  • तेल - 4-5 चमचे

  • मीठ - चवीनुसार

Stuffed Karela Recipe
Solkadhi Recipe : अपचन, मधुमेहावर फायदेशीर आहे सोलकढी, पाहा रेसिपी

2. कृती

  • चवीनुसार आणि पौष्टिकतेने भरलेली कारल्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम कारले नीट धुवून घ्या. नंतर चाकूच्या साहाय्याने कारल्याचा वरचा भाग सोलून घ्या आणि एका भांड्यात काढा.

  • सोललेली कारली वेगळ्या भांड्यात ठेवा. आता कारल्याच्या सालींवर थोडे मीठ घालून १५ मिनिटे झाकून ठेवा.

  • यानंतर, कारले घेऊन ते मधूनमधून चिरुन घ्या. त्याच्या आत असणाऱ्या बिया व इतर गोष्टी काढून घ्या. पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्या.

  • आता कारल्याच्या आत आणि बाहेर थोडे मीठ चोळा आणि अर्धा तास बाजूला ठेवा.

  • थोड्या वेळानंतर, कारल्याला पुन्हा एकदा पाण्याने धुवा म्हणजे कारल्यावरील मीठ निघून जाईल.

  • आता कारल्याचे साल घेऊन ते पाण्याने २-३ वेळा धुवावे व नंतर पाणी पिळून घ्यावे.

  • आता कढईत १ चमचा तेल टाकून ते गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व हिंग घालून परता.

Stuffed Karela Recipe
Kirthi Shetty : कातिल नजर अन् दिलखेचक अदा, अनेकांच्या दिलावर क्रीतीची हवा
  • काही सेकंदांनंतर तेलात हळद, धणे पूड, बडीशेप पूड घाला आणि चांगले परतून घ्या.

  • नंतर यात लाल तिखट, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट व बेसनाचे पीठ घालून मिश्रण ५ मिनिटे भाजल्यानंतर गॅस बंद करा. कारल्यात भरण्यासाठी सारण तयार आहे. आता कारले घेऊन त्यात दाबून सारण भरा.

  • आता कढईत ३-४ चमचे तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात भरलेले कारले टाका आणि झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा.

  • कारले चांगले तळून तपकिरी होईपर्यंत शिजवा. यानंतर गॅस बंद करा. तयार आहे चविष्ट असे भरलेले कारले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com