Dal Tadka Recipe : तडका डाळ बनवण्याच्या 4 सोप्या पद्धती, याप्रकारे फोडणी द्या; परफेक्ट ढाब्यासारखी चव मिळेल

How to Make Dal Tadka :कितीही साध जेवण असलं तरी त्याची चव वाढते ती फोडणीमुळे.
Tadka Dal Recipe Tips
Tadka Dal Recipe TipsSaam Tv
Published On

Dal Takda Recipe Kashi Banval : भारतात अनेक प्रकारच्या डाळींची चव चाखायला मिळते. गरमा गरम वरणावर तडका लावलेली डाळ आणि त्यावर साजूक असं तूप. यामुळे पदार्थाची चव अगदी वेगळी लागते.

कितीही साध जेवण असलं तरी त्याची चव वाढते ती फोडणीमुळे. तुरीची, चण्याची, मुगाची व उडदाच्या डाळीपासून आपण डाळीची चव वाढवू शकतो. प्रत्येक भारतीय (Indian) घरात वरण-डाळ व लोणचं हे ताटात हमखास पाहायला मिळते.

Tadka Dal Recipe Tips
Solkadhi Recipe : अपचन, मधुमेहावर फायदेशीर आहे सोलकढी, पाहा रेसिपी

डाळी या शरीराला प्रोटिन्स (Proteins) देतात व त्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषण तत्व मिळते. पण कधी कधी सारख्या चवीची डाळ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आपल्या चव हवी असते ती हॉटेल स्टाईल सारख्या डाळीची. जर तुम्हालाही परफेक्ट अशी ढाबा स्टाईल फोडणीच्या डाळीची चव चाखायची आहे तर मग या सोप्या पद्धतींचा वापर करा.

1. डाळ बनवताना ती शिजवून घ्या. एका मोठ्या फोडणीत दोन चमचे तूप घाला. गरम झाल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण (Garlic) घाला. नंतर त्याला लाल मिरची व जिऱ्याची फोडणी द्या. त्याचा वास येऊ लागल्यास त्यात शिजवून घेतलेली डाळ घाला व झाकण बंद ठेवून ५ मिनिटे उकळवून घ्या.

Tadka Dal Recipe Tips
Garlic Chutney Recipe : लसणाची लाल चटणी महिनाभर टिकवायची आहे ? या सोप्या टिप्स फॉलो करा

2. एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घाला. गरम झाल्यावर त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि चमचाभर जिरेही घाला. आता त्यात चिमुटभर हिंग घाला. नंतर त्यात शिजवलेली डाळ घाला.

3. कढईत दोन चमचे तूप गरम करा. आता त्यात एक चमचा उडीद डाळ, थोडी कढीपत्ता, एक चमचा मोहरी घाला. चवीनुसार लाल तिखटही घालू शकता. नंतर त्यात वरुन शिजवलेली डाळ घाला.

Tadka Dal Recipe Tips
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

4. प्रथम अर्धा टोमॅटो, एक हिरवी मिरची, अर्धा कांदा, थोडा लसूण बारीक चिरून घ्या. आता कढईत तेल किंवा तूप गरम करा. गरम झाल्यावर त्यात एक चमचा जिरे टाका. शिजल्यावर त्यात लसूण घाला. आता त्यात कांदा घालून परता. शेवटी हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घाला. टोमॅटोचा रस त्यात जाऊ नये यासाठी प्रयत्न करा. आता त्यात थोडे मीठ टाकून डाळ घाला. गरमागरम सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com