Kairich Pann Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Kairich Pann Recipe : कडाक्याच्या उन्हात अशाप्रकारे बनवा चटपटीत कैरीच पन्ह !

Raw Mango Recipe : कच्च्या कैरीपासून बनवलेला कैरी पन्ना स्वादिष्ट तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

कोमल दामुद्रे

Summer Season Recipe : उन्हाळा सुरु झाला की, आपल्या शरीराला थंडगार गारवा हवा असतो. यासाठी आपण अनेक विविध पेयांचा समावेश आपल्या आहारात करतो. रखरखत्या उन्हात आपण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न देखील करतो.

तसेच या दिवसात आंब्याच्या पन्नाची मागणी वाढू लागते. कच्च्या कैरीपासून बनवलेला कैरी पन्ह स्वादिष्ट तसेच आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर (Benefits) आहे. कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेतही कैरीचे पन्ह पिऊन घराबाहेर पडल्यास उष्माघाताचा धोका बराच कमी होतो.

हे पेय मोठ्यांना तसेच लहान मुलांनाही आवडते आणि ते मोठ्या उत्साहाने पितात. या उन्हाळ्यात तुम्हाला कैरीच्या पन्हाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट मँगो पन्ह घरीच तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपी.

1. साहित्य:

  • कच्चा आंबा (कैरी) – ४

  • जिरे पावडर (भाजलेले) – २ टीस्पून

  • गूळ/साखर (Sugar) – ६ चमचे (चवीनुसार)

  • पुदिन्याची पाने – १ टेबलस्पून

  • काळे मीठ – ३ टीस्पून

  • काळी मिरी पावडर – १ चिमूट

  • बर्फाचे तुकडे - 4-5

  • मीठ - चवीनुसार

2. कृती

  • पन्ह बनवण्यासाठी प्रथम कैरी म्हणजेच कच्चे आंबे घ्या आणि ते पाण्याने चांगले धुवून स्वच्छ करा.

  • आता सर्व कच्च्या कैरी एका प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला, कुकर झाकून गॅसवर ठेवा आणि 4 शिट्ट्या होईपर्यंत थांबा.

  • शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा आणि कुकर थंड होण्यासाठी सोडा. कुकरचे प्रेशर सुटल्यावर झाकण उघडून करी बाहेर काढून भांड्यात ठेवा.

  • कच्च्या कैरी थंड झाल्यावर सोलून घ्या आणि त्याचा लगदा खोल तळाशी असलेल्या भांड्यात ठेवा.

  • तयार मिश्रण चांगले मॅश करा आणि त्यात जमा झालेला लगदा काढून वेगळे करा.

  • आता पल्पमध्ये 1/4 कप पाणी घाला आणि पुन्हा चांगले मॅश करा.

  • यानंतर भाजलेले जिरेपूड, काळी मिरी पावडर, गूळ किंवा साखर, काळे मीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

  • आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि झाकण बंद करून मिश्रण करा.

  • यानंतर एका भांड्यात कैरीचे पन्ह काढा आणि त्यात ३-४ बर्फाचे तुकडे टाका आणि पन्ह थंड होऊ द्या.

  • पन्ह थंड झाल्यावर ग्लासमध्ये टाकून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT