Recipe Of Kolhapuri Egg Curry : रोजच्या कंटाळवाणी मेनूपासून ब्रेक घेण्यासाठी नारळ, टोमॅटो आणि कांद्याच्या स्वादिष्ट ग्रेव्हीत बनवलेली एग करी ट्राय करा तेही कोल्हापुरी स्टाईलमध्ये, ही कोल्हापुरी चव तुम्हाला नक्कीच आवडले. ही रेसिपी तुम्ही लंच किंवा डिनर दोन्हीसाठी बनवू शकता.
तसेच पार्टीसाठी (Party) देखील एग करी बनवणे हा अप्रतिम पर्याय आहे. अंड्यांसह (Eggs) काहीतरी वेगळ आणि स्वादिष्ट ट्राय करण्यासाठी ही रेसिपी जाणून घ्या. सर्वांना कोल्हापूर स्टाईलमध्ये बनवलेली एग करी नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी बनवण्याची पद्धत.
एग करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
अंडी – 4
टोमॅटो – 1
टीस्पून हळद – 1
मीठ चवीनुसार
कांदा – 1
गरम मसाला पावडर – 1 टीस्पून
मोहरीचे तेल – 1 कप
किसलेले खोबरे – ½ कप
कोल्हापुरी एग करी बनवण्याची पद्धत -
स्टेप 1 – सर्वप्रथम अंडी उकळा आणि त्यावरील टरफले काढा. आता त्या अंड्यावर मीठ आणि हळद शिंपडा. त्यानंतर अंडी गरम तेलात फ्राय करून घ्या.
स्टेप 2 – आता एका पॅनमध्ये आवश्यतेनुसार तेल टाकून गरम करून घ्या. त्या गरम तेलात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून थोडे तळून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून पेस्ट बनवा.
स्टेप 3 – आता हे तयार मिश्रण एका पॅनमध्ये काढून मध्यम आचेवर ठेवून, त्यात गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
स्टेप 4 – मसाल्यांचा कच्चा वास निघेपर्यंत मिश्रण शिजवा आणि त्यात तुम्ही आवश्यतेनुसार पाणीही घालू शकता. नंतर तळलेले अंडी घालून एक मिनिट शिजवा.
स्टेप 5 – किसलेल्या नारळाचे गार्निश करा आणि डिश सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.