Creamy Corn Chaat Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Creamy Corn Chaat Recipe : चटपटीत खावसं वाटतयं ? ट्राय करा क्रीमी कॉर्न चाट, पाहा रेसिपी

Breakfast Snacks : चटपटीत व खायला चविष्ट असणारी क्रीमी कॉर्न चाट रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

Spicy Recipe : बरेचदा आपल्या काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. अशावेळी आपली भूक भागवण्यासाठी पटकन काय बनवता येईल याचा विचार आपल्याला करता येत नाही.

चटपटीत व खायला चविष्ट असणारी क्रीमी कॉर्न चाट रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जी ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. ही चाट बनवायलाही खूप सोपी आहे.

कॉर्न चाट हा एक नाश्ता आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो, मग तो लहान मुले (Kids) असो किंवा प्रौढ, जर तुम्ही अनेकदा तळलेले आणि तेलकट (Oil) स्नॅक्स टाळत असाल, तर ही कॉर्न चाट तुमच्यासाठी योग्य आहे.

तुम्ही ही क्रिमी कॉर्न चाट चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करू शकता. हा नाश्ता किटी पार्टी, पिकनिक किंवा इतर कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करण्यासाठी योग्य आहे. जर तुम्हाला काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर आजच ही रेसिपी करून पाहा.

1. साहित्य

  • 1 कप उकडलेले अमेरिकन कॉर्न कर्नल

  • 5 चेरी टोमॅटो (Tomato)

  • 1 स्लाईस लिंबूचे तुकडे

  • 1 टेस्पून लाल मिरची पावडर 2

  • टेस्पून शेव

  • 2 चमचे चिरलेली कोथिंबीर

  • 1/2 कप किसलेली झुचीनी

  • 1/2 कप चिरलेली लाल भोपळी मिरची 1/2 चमचे

  • 1/2 चमचे चिरलेली

  • मिरची 1/2

  • चमचे टीस्पून लसूण मेयोनेझ

  • मीठ आवश्यकतेनुसार

2. कृती

  • पहिल्यांदा भाज्या तळून घ्या.

  • एका पॅनमध्ये बटर गरम करा. चिरलेली झुचीनी आणि लाल सिमला मिरची घाला. मध्यम आचेवर १ मिनिट तळून घ्या. आता कॉर्न घालून आणखी एक मिनिट परतून घ्या.

  • मसाले घाला, आता लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घाला. चांगले मिश्रण द्या.

  • गार्निश करून सर्व्ह करा, मिश्रण एका भांड्यात काढा. चेरी टोमॅटो, लिंबू, धणे, शेव आणि लसूण मेयोने सजवा. तुमची मसालेदार क्रीमी कॉर्न चाट तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT