Watermelon Kulfi Recipe : घरच्या घरी ट्राय करा कलिंगडची कुल्फी, पाहा रेसिपी

Summer Season : उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या अशा पदार्थांचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे.
Watermelon Kulfi Recipe : घरच्या घरी ट्राय करा कलिंगडची कुल्फी, पाहा रेसिपी
Published On

Watermelon benefits : उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे आपल्याला गारवा हवा असतो. स्वत:ला थंड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतो. सध्या उन्हाळ्याचा मोसम सुरु आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये लोक स्वतःला थंड ठेवण्यासाठी अनेक युक्त्या अवलंबतात.

डॉक्टर आणि आरोग्य (Health) तज्ज्ञांचेही मत आहे की, उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या अशा पदार्थांचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे. शरीराला थंड ठेवण्यासोबतच ते हायड्रेट ठेवण्यासही मदत करते.

Watermelon Kulfi Recipe : घरच्या घरी ट्राय करा कलिंगडची कुल्फी, पाहा रेसिपी
Summer Healthy Recipe : उन्हाळ्यात पाचनशक्ती स्ट्रॉग बनवायची आहे ? मग नाश्त्यात ट्राय करा ओट्स इडली, पाहा रेसिपी

अशा परिस्थितीत या उन्हाळ्यात तुम्ही घरी कलिंगडची (Watermelon) कुल्फी बनवू शकता. कलिंगडमध्ये खूप थंड प्रभाव असतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाणी (Water) देखील असते. मुलांना कलिंगडची कुल्फी देखील खूप आवडेल. ही कशी बनवायची हे जाणून घेऊया

1. साहित्य

  • कलिंगड - 1 कप (चिरलेला)

  • लिंबाचा रस - 3 चमचे

  • साखर - आवश्यकतेनुसार

  • कुल्फी साचा - 2 ते 3

Watermelon Kulfi Recipe : घरच्या घरी ट्राय करा कलिंगडची कुल्फी, पाहा रेसिपी
Fish Salad Recipe : संडे स्पेशल ! तुम्ही कधी फिश सलादची चव चाखलीये ? पाहा रेसिपी

कृती-

  • कलिंगडची कुल्फी बनवण्यासाठी प्रथम ताजे कलिंगड घेऊन त्याचे छोटे तुकडे करा.

  • त्यानंतर त्याचे सर्व बिया वेगळे करा.

  • यानंतर मिक्सरमध्ये टाका.

  • त्यात गरजेनुसार साखर मिसळा.

  • कुल्फी जितकी जाड असेल तितकी चविष्ट होईल हे लक्षात ठेवा.

  • यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून रस बनवा.

  • यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा.

  • नंतर कुल्फीच्या साच्यात घालून गोठवू द्या.

  • 6 ते 7 तासांनंतर ते गोठेल. त्यानंतर मुलांना सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com