Soyabean Tikka Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Soyabean Tikka Recipe : घरच्या घरी ट्राय करा हॉटेलसारखी सोयाबीन टिक्का, रेसिपी पाहा

Hotel Style Recipe : हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी स्टार्टर खावेसे वाटते. हॉटेलमध्ये स्टार्टर खाल्ल्यानंतर त्याची चव आपल्याला पुन्हा पुन्हा चाखावीशी वाटते. परंतु, हॉटेलसारखे पदार्थ आपल्याला घरच्या घरी बनवता येत नाही.

कोमल दामुद्रे

How To Make Soyabean Tikka :

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी स्टार्टर खावेसे वाटते. हॉटेलमध्ये स्टार्टर खाल्ल्यानंतर त्याची चव आपल्याला पुन्हा पुन्हा चाखावीशी वाटते. परंतु, हॉटेलसारखे पदार्थ आपल्याला घरच्या घरी बनवता येत नाही.

नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत लोकांना चमचमीत पदार्थ खायला आवडतात. जर तुम्हालाही घरच्या घरी बार्बी क्यूसारखा सोयाबीन टिक्का बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करु शकता. जाणून घेऊया रेसिपी.

1. साहित्य

  • सोयाबीन - २ कप

  • दही- अर्धा कप

  • बेसन - अर्धी वाटी

  • मीठ - अर्धा टीस्पून

  • हळद (Turmeric) - अर्धा टीस्पून

  • लाल मिरची - 1 टीस्पून

  • धणे पावडर - 1 टीस्पून

  • गरम मसाला- अर्धा टीस्पून

  • सुक्या कैरी पावडर- अर्धा टीस्पून

  • जिरे पावडर- अर्धा टीस्पून

  • काश्मिरी लाल मिरची - 1 टीस्पून

  • तेल (Oil) - ३ चमचे

  • सिमला मिरची - 1 (चिरलेला)

  • कांदा (Onion) - 1 (चिरलेला)

  • टोमॅटो - १ (चिरलेला)

2. कृती

  • सर्वात आधी सोयाबीन २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून गरम करा.

  • यामध्ये बेसनाचे पीठ घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

  • यानंतर एका भांड्यात दही ठेवून त्यात भाजलेले बेसन घालून सर्व मसाले घालून मिक्स करावे.

  • त्यात सर्व भाज्या घालून मिक्स करा आणि २० मिनिटे तसेच ठेवा.

  • नंतर कढईत तेल टाकून थोडे गरम होऊ द्या. टूथ पिकमध्ये मिश्रणातले सोयाबीन टाका आणि एक एक ठेवा

  • नीट तयार झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या. टूथ पिक वापरून झाल्यावर, प्रत्येक पॅनमध्ये ठेवा आणि तळा. तयार आहे सोयाबीन टिक्का.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT