Aloo Kurma google
लाईफस्टाईल

South Indian Aloo Kurma Recipe: घरच्या घरी साऊथ स्टाईल आलू कुरमा कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

Aloo Kurma: चपाती, भात किंवा डोसासोबत तुम्ही आलू कुरमा खाऊ शकता. हा पदार्थ चवीला तर भारी आहेच, पण बनवायला सुद्धा सोपा आहे. चला तर जाणून घेऊ रेसिपी.

Saam Tv

Aloo Kurma Recipe: आलु कुरमा ही एक स्वादिष्ट आणि मसालेदार दक्षिणेत खाल्ली जाणारी भारतीय भाजी आहे. जी बटाट्यांपासून तयार केली जाते. ही भाजी खास करून पोळी, पराठा, डोसा किंवा साध्या भातासोबत खूप चविष्ट लागते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करू शकतो.

साहित्य

३-४ बटाटे

खोवलेला नारळ

१ टेबलस्पून खसखस

१ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे

तेल

१ टीस्पून जिरे

१ मोठा चिरलेला कांदा

१ चिरलेला टमाटर

अर्धा टीस्पून हळद

1 टीस्पून लाल तिखट

1 टीस्पून धनेपूड

कोथिंबीर

सर्वप्रथम, मध्यम आकाराचे ३-४ बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या व त्यांना सोलून चिरून ठेवा. एका मिक्सरमध्ये दीड कप खोवलेला नारळ, १ टेबलस्पून खसखस पाण्यात भिजवून घ्या, आणि १ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे टाकून त्याची मऊ पेस्ट तयार करा.

आता कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून जिरे टाका. त्यावर १ मोठा चिरलेला कांदा परतवा. कांदा थोडा ब्राउन झाला की त्यात १ चिरलेला टमाटर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, आणि 1 टीस्पून धनेपूड घालून छान परतून घ्या. त्यात तयार केलेली नारळाची पेस्ट घालून ५ मिनिटं शिजवा.

आता उकडलेले बटाटे घाला व थोडं पाणी टाकून गरजेनुसार ग्रेवी तयार करा. ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवून शेवटी १ टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

सजावटीसाठी वरून कोथिंबीर टाका. ही भाजी गरम पोळी, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करा. झणझणीत, नारळाच्या स्वादासह आलु कुरमा एकदम परफेक्ट मेजवानी ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT