Saam Tv
घरात केलेले नाश्त्याचे पदार्थ जसे की, पोहे, उपमा, इडली, डोसायांसोबत शेंगदाण्याची चटणी परफेक्ट ठरते.
शेंगदाणे, तेल, हिरव्या मिरच्या, पाणी, मीठ, लिंबाचा रस, आलं, लसूण पाकळ्या, पुदीना, जीरे इ.
सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्या. त्याचसोबत जिरे सुद्धा भाजून घ्या.
शेंगदाणे सोलून मिक्सरमध्ये घाला.
आता मिक्सरमध्ये लिंबाचा रस,आलं, लसूण, तेल आणि हिरव्या मिरच्या घाला. आता मिश्रण वाटून घ्या.
ते बारिक वाटून घेतल्यानंतर, त्यात पुदिन्याची पाने,मीठ आणि पाणी घालून वाटा.
शेंगदाण्याची पेस्ट एकदम बारिक गुळगुळीत करून घ्या. एका भांड्यात काढून घ्या.
कढीपत्ता हवी असल्यास मिरची आणि मोहरीची फोडणी शेंगदाण्याच्या चटणीवर द्या.
चला तयार आहे तुमची झटपट अन् नाश्त्यासाठी परफेक्ट चटणी.