Saam Tv
सध्याचे कडाक्याचे ऊन झाडांना चांगलच शेकवून काढतयं.
त्यामध्ये नाजूक तुळस लगचेच सुकून जाते. अशा वेळेस काही उपाय करणे गरजेचं आहे.
तुळशीचे अनेक फायदे असतात. त्यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ठ्या खूप महत्व असते.
उन्हाळ्यात तुळस सुकल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच पाणी द्या.
तुळशीच्या रोपासाठी सूत, वाळू आणि जैविक खत असलेली माती मिक्स करा.
उन्हाळ्यात तुळशीच्या मुळाशी कायम ओली माती ठेवावी.
रोप सुकत असेल तर कुंडी बदला.
सुकलेली पाने व कोरड्या फांद्या वेळोवेळी कापा. त्याने झाडाला नवीन पाने येतील.