Saam Tv
बाजारात आता ताजी कोकमं आणि त्याचे अनेक पदार्थ पाहायला मिळतात.
उन्हाळ्यात तुम्ही घरच्या घरी आमसूलाची आंबटगोड चटणी करू शकता.
आमसूलाची चटणी चविष्ठ आणि बनवायला एकदम सोपी असते. चला जाणून घेऊ रेसिपी.
आमसूल ८ ते १०, जीरं १ चमचा, मिरे ४ ते ५ , गूळ दीड वाटी आणि खडे मीठ चवीनुसार इ.
सर्वप्रथम पाण्यात आमसूल दीड ते दोन तास छान भिजत ठेवा.
आता मिक्सरचे भांडे घ्या त्यात जीरं, मिरं आणि खडेमीठ बारिक वाटून घ्या.
पुढे त्याच भांड्यात आमसूलं आणि पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.
याच पेस्ट मध्ये किसलेला गुळ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवा.
तयार आहे तुमची झटपट चटपटीत चटणी. यात तुम्ही लाल तिखट घालू शकता.