Nachnichi Bhakri Recipe google
लाईफस्टाईल

Nachnichi Bhakri Recipe : नाचणीची भाकरी कडक होतेय? ही सोपी ट्रीक करा फॉलो, मऊसूत होतील भाकऱ्या

Soft Bhakri Tips : नाचणीची भाकरी कडक होते का? गरम पाणी, विश्रांती आणि योग्य पद्धती वापरून मऊसूत भाकरी बनवण्याची सोपी ट्रिक जाणून घ्या. भाकरी नेहमीसारखी परफेक्ट होईल.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय लोकांच्या आहारात चपाती, भाकरी, वरण भात हे जेवण असते. बरीच मंडळी चपाती न खाता भाकरी खाण्यावर भर देतात. भाकरीमध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात. त्यातच नाचणी भाकरी बरेच लोक आवडीने खातात. नाचणीमध्ये अनेक महत्वाचे घटक असतात. जे शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. मात्र बऱ्याच गृहीणींना भाकरी करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यातली मोठी समस्या म्हणजे भाकरी शेकवताच ती पापडासारखी कडक होते. पुढे आपण यावर जबरदस्त टिप्स पाहणार आहोत.

नाचणीचे पीठ मळण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी नाचणीची मऊसूत भाकरी बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी करून घ्या. त्यामध्ये मीठ आणि एक चमचा तूप मिसळा. जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा गॅस बंद करा. आता पाणी गरम असतानाच नाचणीचे कणीक मळायला घ्या. गरम पाण्यामुळे नाचणीचे पीठ कमी वेळेत मळले जाते. मळलेल्या पीठाच्या लगेच भाकऱ्या थापू नका. १५ ते २० मिनिटे त्यावर झाकण ठेवा. त्याने पीठ व्यवस्थित सेट होते. तसेच भाकऱ्या नरम होतात.

नाचणीच्या भाकऱ्या बनवण्याची योग्य पद्धत

नाचणीचे मळलेले पीठ १५ मिनिटांनी पुन्हा मळून घ्या. एक पीठाचा मोठा गोळा घेऊन भाकरी धापा. आता जाड तवा किंवा नॉनस्टीकचा तवा घ्या. तवा पूर्ण गरम झाल्याशिवाय त्यावर भाकरी शेकवू नका. तवा शेकल्यावरच भाकरी दोन्ही बाजूने शेकवा.

भाकरी शेकवत असताना सतत उलट पलट करू नका. त्याने भाकरी कडक होण्याची शक्यता असते. शक्यतो भाकरी चमचा न वापरता कॉटनच्या रुमालाने शेकवावी. चला तयार आहे मऊ लुसलुशीत भाकरी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT