ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाक करताना तेलाने सुरुवात केली जाते.
प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तेल वापरले जाते. त्यामुळे अन्नाची चवही वेगळी होते.
पुढे आपण शरीरासाठी फायदेशीर असणाऱ्या तेलांची माहिती आणि नावे जाणून घेणार आहोत.
सुर्यफुलाच्या तेलात जीवनसत्व E मोठ्या प्रमाणात असते. तसेच पॉली- अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
महाराष्ट्रात या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
शेंगदाण्याच्या तेलात मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
शेंगदाण्याचे तेल हे महाराष्ट्रासोबत गुजरात, राजस्थानमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते.
तीळाच्या तेलात कॅल्शियम, मॅग्नेशियम असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात नारळाचे तेल वापरले जाते. शक्यतो तळणीसाठी या तेलाचा वापर केला जातो.