Sakshi Sunil Jadhav
भावंड सौख्य लाभेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. प्रवास घडेल.
तब्येत जपा. पैशाची आवक जावक उत्तम राहील.
बोलण्याने समोरच्याला आपलेसे कराल. नव्याने गोष्टी जिंकण्याची खूमखूमी राहील.
अमावस्येची विशेष आपल्या ऐवज आणि जिन्नस यांची काळजी घ्यावी. सावध रहा.
जवळच्या लोकांबरोबर आनंदी क्षण जगाल. केलेल्या कामाविषयी कृतकृत्य भावना निर्माण होईल.
चाणाक्षपणे मेहनत घ्याल. आपले वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील.
आज अमावस्या आहे. भाग्यकारक घटना घडतील. प्रेमामध्ये यश लाभणार आहे. दिवस आनंदी असेल.
नको असलेल्या गोष्टी आज कराव्या लागतील. मनावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील.
जोडीदाराची आरती ओवाळावी लागेल. "सुसरबाई तुझीच पाठ माऊ" असा काहीसा दिवस आहे.
जुनी दुखणे डोके वर काढतील. ठरवून काही गोष्टी होणार नाहीत. गुप्तशत्रू वाढतील.
विशेष शिव उपासना आपल्याला फलदायी ठरेल. पैशांचा लाभ होईल. संशोधक वृत्ती वाढेल.
घरी एखाद्या धार्मिक कार्य घडेल. साधेपणाने समोरच्याची मने जिंकाल. शेतीवाडी मध्ये फायदा आहे.