Methi Parathe Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Methi Parathe Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला, आता घरीच बनवा खुसखुशीत मेथीचे पराठे, १० मिनिटांत होईल रेसिपी तयार

How To Make Methi Paratha At Home: पावसाळ्यात आरोग्यदायी नाश्ता हवा असेल तर मेथीचे पराठे उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी चवदार, सोपी आणि घरी सहज बनवता येईल.

Manasvi Choudhary

Homemade Methi Paratha: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक असणे अत्यंत महत्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाल्ल्याने आरोग्यावर देखील परिणाम होतो अशा स्थितीत तुम्ही घरच्या घरी नाश्ता बनवू शकता. मेथीची भाजी खायला अनेक जण नाक मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असल्याने अनेकांना ती खायला नकोशी वाटते. लहानमुले देखील मेथी खात नाही अशावेळी तुम्ही ही सोपी रेसिपी घरच्या घरी ट्राय करू शकता.

मेथीचे पराठे खायला सर्वांनाच आवडतात. मेथीचे पराठे घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. गव्हाच्या पीठापासून बनवलेले हे पराठे चवदार होतात. नाश्त्याला देखील तुम्ही मेथी पराठे सहज बनवू शकता.

मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

मेथीचे पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्व साहित्य एकत्र घ्यावे लागेल. यात गव्हाचे पीठ,मेथी, मसाला, हळद, जीरे, ओवा, तीळ, धना पावडर, आलं- लसूण पेस्ट, मीठ, तेल हे साहित्य तयार ठेवा.

मेथीचे पराठे बनवण्याची कृती:

स्टेप 1:

मेथी पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या म्हणजे मिश्रणामध्ये सहज मिक्स करता येईल.

स्टेप 2:

यानंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या त्यात हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जीरे, ओवा, तीळ, आलं-लसणाची पेस्ट,तेल आणि बारीक चिरलेली मेथी एकत्रित मिक्स करा.

स्टेप 3:

मेथी मिक्स केलेल्या कणकेचा गोळा तयार करून दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कणीक कडक होणार नाही याची काळजी घ्या.

स्टेप 4:

त्यानंतर कणकेचे छोटे गोळे तयार करून त्याची पोळी लाटा. गॅसवर गरम तव्यावर ही पोळी तेल घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

स्टेप 5:

अशाप्रकारे गरमा गरम मेथीचे पराठे दही किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

दापोडी ST कार्यशाळेतील भांडार खरेदी घोटाळा; दोषींवर कारवाई होणार; मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १५ दिवस प्रतिबंधात्मक आदेश; ५ पेक्षा जास्त लोकही जमू शकत नाहीत! नेमकी कशावर घातलीय बंदी?

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT