Siddhi Hande
हॉटेलमध्ये गेल्यावर तंदूर रोटी खायला सर्वांनाच आवडते. तुम्ही घरीदेखील तंदुर रोटी बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला गव्हाचे पीठ, दही, तेल, मीठ आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे.
यानंतर थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या.
हे पीठ जास्त पातळ किंवा घट्ट मळू नका.
यानंतर पीठावर ओले कापड ठेवा आणि अर्धा तास बाजूला ठेवा.
यानंतर पिठाचे लहान लहान गोळे बनवून घ्या. यानंतर या पिठाची लहान पोळी लाटून घ्या.
एका बाजूला लोखंडी तवा गरम करा. त्यावर पाणी शिंपडा.
पाणी सुकल्यावर त्यावर रोटी टाका.
यानंतर दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्या.तुम्ही तंदूर रोटी खाऊ शकता.