Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात अनेक रानभाज्या मार्केटमध्ये सहज येत असतात.
पुढे आपण पारंपारिक पद्धतीने दिंडाची भाजी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत.
दिंडे, चणा डाळ, चिरलेला कांदा,लसूण, मोहरी, हिंग, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर इ.
चणा डाळ २ तास भिजत ठेवा. आता दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे सोलून घ्या.
आता भाजी चिरून धुवून घ्या. पुढे कढई गरम करून घ्या.
मोहरी, लसूण, कांद्याची फोडणी द्या. मग त्यात हळद,हिंग आणि मसाला टाका.
आता त्यामध्ये डाळ आणि पाणी टाकून झाकण लावून ७ मिनिटे ठेवा.
पुढे भाजीत मीठ घालून एकत्र करून घ्या. डाळ शिजली की कोथिंबीर घाला.
गरमा गरम भाजी भाकरीसोबत सर्व्ह करा.