Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, एक ठार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, पुणे-यवतमाळ राडा, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

दंडोबा डोंगरात दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली स्पोर्टस् फौंडेशनकडून दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा- २०२५ आयोजित करण्यात आली होती.मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दंडोबा डोंगरावर ही राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक

समृद्धी महामार्गावर वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे.

भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकून ठार झाला आहे.

वाशिमच्या कारंजा जवळ असलेल्या पोहा गावाजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोर चॅनल क्रमांक 188 हा अपघात झाला आहे ..

ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह काढण्याच काम गेल्या तासभरा पासून सुरू आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 'नाईट रायडर' बारवर मनसेची मध्यरात्री धडक

शनिवारी पनवेलमध्ये झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांवर तीव्र रोष व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले होते.

"छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात?" असा ठाकरेंनी सवाल करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.

या भाषणानंतर अवघ्या काही तासांत मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले.

शनिवारी मध्यरात्री १२ वाजता पनवेल तालुक्यातील कोन गावातील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मनसेने धडक कारवाई करत फोडाफोड केली.

मनसे कार्यकर्ते 15 सह योगेश चिले यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

नागपूरला दरोडा टाकून वर्धेत आले अन पोलिसांच्या जाळ्यात अडकले

- वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला केली अटक

- वर्धेच्या मस्जिद चौकात केली कारवाई

- आरोपीना अटकेचा थरार सिसिटीव्हीत कैद

- चार आरोपीना अटक तर एक आरोपी फरार

- आरोपीकडून दोन देशी कट्टा पोलिसांनी केला जप्त

- नागपूर जिल्ह्याच्या बोरी येथे देशी दारू दुकानदाराला देशी कट्टा दाखवत आरोपीनी केली होती लुटपाट

मावळ तालुक्यातील ठाकर वाडीत पाच पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार कायदेशीर हक्क

वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला, महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वन हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ३/२ प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत, आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला आहे.

Washim: जिल्हा परिषद शाळेला सिस फाऊंडेशन कडून तीन लाखांचे संगणक भेट

वाशिमच्या साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळेला डोंबिवलीच्या सिस फाउंडेशन कडून सद्भावना प्रकल्पा अंतर्गत तीन लाखांचे संगणक संच भेट देण्यात आलेत. त्यामुळं या शाळेत शिक्षण घेणाऱ्या १०६७ मुलांना संगणकीय शिक्षण घेण्यासाठी फायदा होणार आहे. यापूर्वी या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत राज्यात पहिला क्रमांक मिळववत ५१ लाखांचं पाहिलं बक्षीस मिळवलं होतं. या शाळेत वाशीम शहरासह आजू बाजूच्या परिसरातील विध्यार्थीही शिक्षण घेतात.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात एसआयटी गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ यांची एक एसआयटी गठीत केली आहे.

या एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांची टीम तपासासाठी मदत करणार आहे.

SIT लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

भाजपाचे दोन माजी जिल्हा परिषदेच सदस्य ठाकरे गटात

यवतमाळच्या वणीत भाजपला गळती,भाजपचे दोन माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश वणी विधानसभा मतदारसंघातील भाजप, काॅग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय.

त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे

त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Maharashtra Live News: पुणे विमानतळावर पाच वर्षांत १४५ 'बर्ड हिट' च्या घटना

देशातील विविध विमानतळांवर ‘बर्ड हिट’ म्हणजेच पक्ष्यांच्या धक्का बसण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे

देशातील सर्वाधिक घटना दिल्ली विमानतळावर

२०२० ते २०२५ जून या कालावधीत दिल्लीत सर्वाधिक ६९५ घटना घडल्या आहेत

पुणे विमानतळावर १४५ वेळा विमानांना पक्ष्यांचे धक्के बसले असल्याची माहिती समोर

मुंबई (४०७), अहमदाबाद (३३७), बंगळुरू (३४३), हैदराबाद (२०७) या विमानतळांवरही अशा घटना मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीस राहणार उपस्थित.

मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे होणाऱ्या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.

एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ,रवींद्र फाटक ही राहणार उपस्थित.

रखडपट्टी आणि दुरवस्थेवरून वैतागले अजित पवार

रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वैतागले आहेत.

मुंबई गोवा महामार्गाला साडेसाती लागली असल्याचं त्यांनी म्हटलंय . दरवर्षी गणेशोत्सव आला की आम्ही सांगतो लवकरच करू पण तो काही पूर्ण होत नाही.

नितीन गडकरी यांनीही यासाठी प्रयत्न केले. पण कधी चुकीचा ठेकेदार तर कधी वेगवेगळ्या अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले. तो लवकरच पूर्ण करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या कडून मिश्किल पणे टिप्पणी, आम्ही तिघे मिळून योग्य निर्णय घेऊ

मंत्रीमंडळ स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही केल्या सुटेना.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या अलिबाग दौऱ्यात या मुद्याला मिश्किल पणाने स्पर्श करताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघेजण मिळून यातून लवकरच मार्ग काढू अशी टिप्पणी केल्याने रायगड पालकमंत्रीपदाचे घोंगडे आणखी काही काळ भिजत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मात्र आपण जिल्हा नियोजन साठी निधी कमी पडू देणार नाही हे सांगायला ते विसरले नाही.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकिय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणारभूमिपूजन

या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सह इतरही मंत्री राहणार उपस्थित

तुळजापुरात उभारण्यात येणाऱ्या 108 फुट शिल्पाचे मागवले शिल्पकाराकडुन फायबर मॉडेल

तुळजाभवानी मंदीराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत 108 फुट शिल्प उभारले जाणार आहे.

या शिल्पाचे शिल फायबर मॉडेल मागविण्यात आलेले आहेत अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आलीय.

108 फुट उंचीचे भव्य ब्रॉंझ धातुचे शिल्प उभारण्यात येणार आहे.

तुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रसंगावर असणार आहे.

कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली अडीच ते तीन फुट उंचीचे फायबर मॉडेल्स मागविण्यात आली असुन 31 ऑगस्टपर्यंत कलासंचनालयाकडे पाठवण्याच आवाहन करण्यात आलय.

अर्धवट माहिती घेवुन विरोधकांनी राज्यातील जनतेची दिशाभुल करू नये-रोहित पवारांना इशारा

राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला

ज्यावर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलय…

रोहित पवारानी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतोय

पैश्यांची मागणी करतोय त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता

त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या आणि मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे

PMPML Bus: पीएमपी बसच्या तिकिटातील अपहार केल्याने 46 वाहकावर कारवाई

मोबाईलवर बोलणे सिग्नल तोडणे फेरीमध्ये बदल करणे वाहतूक भंग करणाऱ्यावर ही कारवाई

गेल्या तीन महिन्यात पीएमपीच्या 2150 कर्मचाऱ्यावर तिकीट तपासणी पथकाकडून कारवाई

चालकाकडून वाहतूक नियमाचा वेळोवेळी भंग होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे

पीएमपीच्या वाहकाकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार तिकिटात करत होत असल्याने कारवाई करण्यात आली आहे

MPSC कडून ई केवायसी ची प्रक्रिया लांबणीवर

अचानक निर्णय झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम

एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी एक केवायसी आयोगाने बंधनकारक केली होती

उमेदवाराने एकदाच केवायसी केल्यानंतर सर्व परीक्षा देता येणार होत्या

परीक्षेत पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय आयोगाने घेतला होता.

प्रशासकीय कारणामुळे इ केवायसी प्रक्रिया पुढे गेली असल्याचे आयोगाने स्पष्ट केला आहे

केवायसी कधी होणार याची तारीख लवकरच नव्याने जाहीर केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केला आहे

कोकणात डोंगरदऱ्यात धुक्याची चादर

कोकणातील सौंदर्यं पावसाळ्यात आणखीणच खुलून दिसत...

हिरवागार निसर्ग आणि यात डोंगरात धुक्याची चादर...जणु ढगच पृथ्वीतलावर अवतरलेत असच काहीचं वातावण सध्या कोकणात पहायला मिळतंय...

श्रावणमास सुरु आहे त्याच अधुनमधून पडणा-या श्रावणधारा....आणि डोंगराच्या कुशीत पडणारं धुकं त्यामुळं कोकणातील सध्याचं वातावरण अल्हाददायक झालय...

मंत्री शिरसाट यांचं वादग्रस्त व्यक्तव्य; आमदार मिटकरींनी दिलं त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी स्पष्टच स्पष्टीकरण दिलंय..

"सामाजिक न्यायभवनाच्या वस्तीगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे...

आपल्या बापाचं काय जातंय" असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलं होतंय. त्यांच्या विधानाचा परत पराचा कावळा केला गेला असल्याचे आमदार मिटकरी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com