Soft Chapati Making Tips in Marathi Saam TV
लाईफस्टाईल

Soft Chapati Making Tips: मऊ लुसलुशीत चपातीसाठी अशी मळा कणीक; दिवसभर पोळ्या राहतील मऊ

How To Make Soft Chapati Tips: पीठ चांगलं मळलं गेलं तरंच चपाती तुम्हाला हवी तशी छान मऊ आणि लुसलुशीत बनवता येते. मात्र अनेकदा पीठ फार पातळ किंवा मऊ मळलं जातं आणि चपात्या निट बनत नाहीत.

Ruchika Jadhav

पोळी भाजी खाताना पोळ्या म्हणजेच चपात्या अदगी ओठाने तुटतील इतक्या मऊ असाव्यात असं सर्वांनाच वाटतं.चपाती मऊ व्हावी, ती गोल असावी, जास्त करपलेली नसावी, कच्ची नसावी अशा सर्वच गोष्टींची काळजी घेत चपाती बनवावी लागते.

परफेक्ट चपाती बनण्यासाठी आपण कणीक मळण्यापासून विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. पीठ चांगलं मळलं गेलं तरंच चपाती तुम्हाला हवी तशी छान मऊ आणि लुसलुशीत बनवता येते. मात्र अनेकदा पीठ फार पातळ किंवा मऊ मळलं जातं आणि चपात्या निट बनत नाहीत. त्यामुळे आज परफेक्ट चपाती कशी बनवायची याची माहिती जाणून घेऊ.

  • कणीक मळताना भांड्यात पीठ घेतल्यावर त्यात योग्य प्रमाणत मीठ टाका. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करा.

  • सुरुवातीला तुमच्या हाताला जास्त पीठ चिकटणार नाही. मात्र नंतर पाणी वाढवल्यावर दोन्ही हाताचे अंगठे आणि तळ हाताने चांगलं एकजीव करत पीठ मळून घ्या.

  • नंतर आपल्या हाताला सुकं पीठ लावा आणि मळत राहा. काही वेळाने तुम्हाला पीठ फारच सुक्क जाणवलं तरंच अगदी थोडं पाणी यात मिक्स करा. अन्यथा आहे तेवढ्या पाण्यात पीठ मळत राहा.

  • काहीवेळात पीठ एकत्र एकजीव होईल. त्यानंतर पीठ एका बाऊलमध्ये ठेवा. महत्वाची सिक्रेट ट्रीक म्हणजे पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा.

  • अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर हातावर आणि टोपात थोडं तेल टाका. त्यानंतर तेलामध्ये देखील हे पीठ मस्त मळून घ्या. नंतर याचे लहान गोळे तयार करून घ्या.

  • तयार गोळे अलगद हाताने छोटा गोल लाटून घ्या. त्यानंतर यावर मध्यभागी तेल लावून छोट्या चपातीची त्रिकोणी किंवा गोल घडी करा.

  • त्यानंतर चपाती लाटून ती मिडीअम टू लो फ्लेमवर भाजून घ्या. या टीप्स फॉलो केल्याने तुमची चपाती मस्त टम्म फुगेल, शिवाय ती अदगी रात्रीपर्यंत मऊ राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT